मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /‘स्मार्ट पार्किंग’साठी एअरटेल पेमेंट्स बँक आणि 'पार्क+'ची हातमिळवणी; FASTag च्या मदतीने होणार पार्किंग पेमेंट

‘स्मार्ट पार्किंग’साठी एअरटेल पेमेंट्स बँक आणि 'पार्क+'ची हातमिळवणी; FASTag च्या मदतीने होणार पार्किंग पेमेंट

मार्की व्यावसायिक जागा आणि रहिवासी इमारतींमध्ये फास्टॅग आधारित डिजिटल पार्किंग (FASTag based digital parking) सेवा देण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्या आहेत.

मार्की व्यावसायिक जागा आणि रहिवासी इमारतींमध्ये फास्टॅग आधारित डिजिटल पार्किंग (FASTag based digital parking) सेवा देण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्या आहेत.

मार्की व्यावसायिक जागा आणि रहिवासी इमारतींमध्ये फास्टॅग आधारित डिजिटल पार्किंग (FASTag based digital parking) सेवा देण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्या आहेत.

  नवी दिल्ली 07 जानेवारी : एअरटेल पेमेंट्स बँकेने (Airtel Payments Bank) गुरुवारी पार्क प्लस (Park+) या कंपनीसोबत करार केला असल्याचे जाहीर केले. मार्की व्यावसायिक जागा आणि रहिवासी इमारतींमध्ये फास्टॅग आधारित डिजिटल पार्किंग (FASTag based digital parking) सेवा देण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्या आहेत. एअरटेल पेमेंट्स बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी आणि गाडीवर असणाऱ्या फास्टॅगच्या मदतीने पार्किंग इकोसिस्टीम डिजिटल (Digital Parking Ecosystem) करण्यासाठी हा करार करण्यात आल्याचे कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

  पार्क प्लस ही कंपनी देशातील मोठमोठ्या पार्किंग स्पेसचे ऑटोमेशन (What is Park+) करते. यासाठी ते फास्टॅगची मदत घेतात. देशातील बहुतांश पार्किंगमध्ये फास्टॅगमार्फत होणारे पेमेंट हे पार्क प्लसच्या सिस्टीममधून प्रोसेस होते. दुसरीकडे, एअरटेल पेमेंट्स बँक ही फास्टॅग इश्यू करणाऱ्या देशातील टॉप पाच कंपन्यांपैकी (FASTag by Airtel Payments Bank) एक आहे. एअरटेल थँक्स ॲपच्या (Airtel Thanks App) माध्यमातून ग्राहक फास्टॅग विकत घेऊ शकतात. या करारानंतर दोन्ही कंपन्या संयुक्तपणे काम करणार आहेत. करारामधील माहितीनुसार, पार्क प्लसच्या फास्टॅगसंबंधी सर्व सुविधा एअरटेल पेमेंट्स बँक वापरू शकणार आहे. या सुविधांमध्ये पेमेंट इश्यू करणे (Issuance), संपादन करणे (Acquiring), रिचार्ज करणे (Recharge) आणि टेक्नॉलॉजी सपोर्ट (Technology support) अशा गोष्टींचा समावेश आहे.

  WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

  “आम्ही पार्किंग फी पेमेंट्स (Parking Fee payments) असा ऑप्शन सुरू करणार आहोत. यामुळे पार्किंग लॉटमधून जाताना गाडीच्या फास्टॅगमधून पार्किंगचे पैसे (Pay for parking through FASTag) कापले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस असल्यामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाचणार आहे.” असं कंपनीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आले आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेकडून फास्टॅग घेतलेल्या ग्राहकांना काही विशेष सुविधाही मिळणार आहेत. यामध्ये टोल प्रेडिक्टर (Toll predictor), लो बॅलन्स अलर्ट (low balance alert), ऑटोमेटिक रिचार्ज टॉपअप (Automatic recharge top-up) अशा सुविधांचा समावेश आहे.

  Car साठी का आवश्यक असते NOC, No Objection Certificate साठी घरबसल्या करा अप्लाय

  पार्क प्लस सिस्टीम या सध्या देशातील 1,500 हून अधिक सोसायटींमध्ये, 30 हून अधिक मॉल्समध्ये. तसेच 150 हून अधिक कॉर्पोरेट पार्क्समध्ये बसवण्यात आली आहे. “सध्या देशातील बरेच लोक प्रवासासाठी स्वतःची गाडीच वापरण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे डिजिटल पार्किंग फी घेतली गेली, तर लोकांचा बराचसा वेळ वाचणार आहे.” अशी माहिती एअरटेल पेमेंट्स बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गणेश अनंत नारायणम यांनी दिली.

  First published:

  Tags: Airtel, Fastag