Home /News /technology /

Vodafone-Idea नंतर Airtel Recharge ही महागला, जाणून घ्या नवे Tariff Rate

Vodafone-Idea नंतर Airtel Recharge ही महागला, जाणून घ्या नवे Tariff Rate

टेलिकॉम कंपनी Airtel चे रिचार्ज प्लॅन 26 नोव्हेंबरपासून महागले आहेत. Vodafone-Idea चे रिचार्ज वाढल्यानंतर Airtel नेही दरात वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : टेलिकॉम कंपनी Airtel चे रिचार्ज प्लॅन 26 नोव्हेंबरपासून महागले आहेत. Vodafone-Idea चे रिचार्ज वाढल्यानंतर Airtel नेही दरात वाढ केली आहे. नव्या टॅरिफ प्लॅननुसार, Airtel चा सर्वात स्वस्त 79 रुपयांचा प्लॅन आता 99 रुपये झाला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये 200 MB डेटा आणि 1 पैसा प्रति सेकंद कॉलिंगची सुविधा मिळेल. Airtel 149 चा प्लॅन आता 179 रुपये झाला आहे. 219 रुपयांचा प्लॅन 265 रुपये झाला आहे. 249 रुपयांचा रिचार्ज 299 आणि 298 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 359 रुपयांत मिळेल. Airtel चा सर्वात पॉप्युलर 598 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी आता 719 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 84 दिवस वॅलिडिटी असणाऱ्या एयरटेल प्रीपेड प्लॅनची किंमत आता कमीत-कमी 455 रुपये होईल. 598 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 719 रुपये आणि 698 रुपयांच्या प्लॅनची किंमत 839 रुपये झाली आहे. Airtel ने वार्षिक प्रीपेड प्लॅनचे दरही वाढवले आहेत. 365 दिवसांची वॅलिडिटी असणारा 1,498 रुपयांचा प्रीपेड प्लान आता 1,799 रुपये झाला आहे. तर 2,498 रुपयांचा प्लॅन 2,999 रुपये झाला आहे.

    Vodafone Idea ग्राहकांना फटका; टॅरिफ प्लॅनसाठी आजपासून नवे दर लागू

    Vodafone Idea रिचार्ज प्लॅनही महागले - Vodafone Idea ने 25 नोव्हेंबरपासून सर्व प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीनंतर Vodafone Idea ग्राहकांना जवळपास 25 टक्के अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान, 26 नोव्हेंबरपासून देशातील अनेक शहरांत Vodafone-Idea कंपनी 5G ट्रायल सुरू (Vodafone-Idea 5G Trial) करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. 'आजपासून आम्ही परिवर्तनासाठी सज्ज आहोत. आजपासून आम्ही 5G ट्रायल सुरू करत आहोत. टेक्नोलॉजीच्या या पुढच्या टप्प्यात आमची साथ द्या' असं ट्विट कंपनीने केलं आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Airtel, Recharge, Tech news, Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या