मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Airtel चे 2 नवे रिचार्ज प्लॅन लाँच; केवळ 78 रुपयांत 5GB डेटासह मिळेल अनलिमिडेट म्युझिक

Airtel चे 2 नवे रिचार्ज प्लॅन लाँच; केवळ 78 रुपयांत 5GB डेटासह मिळेल अनलिमिडेट म्युझिक

Airtel ने ग्राहकांच्या सुविधेसाठी एक खास Data Add-On Pack लाँच केला आहे.

Airtel ने ग्राहकांच्या सुविधेसाठी एक खास Data Add-On Pack लाँच केला आहे.

Airtel ने ग्राहकांच्या सुविधेसाठी एक खास Data Add-On Pack लाँच केला आहे.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : Airtel ने ग्राहकांच्या सुविधेसाठी दोन नवे Airtel Data Add-On Pack लाँच केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना जबरदस्त डेटासह Wynk Premium सस्बक्रिप्शन फ्री मिळणार आहे. त्याआधी एअरटेलने अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशनवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅनही लाँच केले होते.

78 रुपये प्लॅन -

Airtel च्या 78 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 5GB हाय स्पीड डेटासह Wynk प्रीमियमचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. अ‍ॅड फ्री म्युझिक आणि अनलिमिडेट साँग डाउनलोड करण्यासाठी Wynk प्रीमियमचा एक महिन्याचा अ‍ॅक्सेसही मिळणार आहे. या प्लॅनमध्ये डेटाची वॅलिडिटी, चालू प्लॅनची वॅलिडिटी संपेपर्यंत असणार आहे. त्या निश्चित कालावधीमध्ये प्रीपेड डेटा रिचार्ज संपल्यानंतर, Airtel Data Add-On Pack मधील डेटाही संपल्यास, त्यापुढे प्रत्येक 1MB साठी 50 पैसे मोजावे लागणार आहेत.

(वाचा - Airtel ने सुरू केली पेमेंट सर्व्हिस; ट्रान्झेक्शन सुरक्षित होणार, कंपनीचा दावा)

248 रुपये प्लॅन -

या प्लॅनमध्ये युजर्सला 248 रुपयांत 25GB डेटा मिळतो. डेटासह युजर्सला Wynk प्रीमियमचं फ्री सब्सक्रिप्शनही मिळतं. तसंच युजर्सला अ‍ॅड फ्री म्युझिक आणि अनलिमिडेट साँग डाउनलोड सुविधा असणाऱ्या Wynk Premium चं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं. एअरटेलच्या या 248 रुपयांच्या डेटा-ओनली प्लॅनची वॅलिडिटी, तुमचा चालू प्लॅन संपेपर्यत असते.

(वाचा - Paytm ची जबरदस्त ऑफर; पूर्णपणे मोफत मिळवू शकता LPG गॅस सिलेंडर)

दरम्यान, युजर्स Wynk Premium चं सब्सक्रिप्शन वेगळंही घेऊ शकतात. त्यासाठी Airtel Thanks App च्या होमपेजवर डिजिटल स्टोरवर क्लिक करावं लागेल. तेथे Wynk Premium चा पर्याय मिळेल. Wynk Premium चं एक महिन्याचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी 49 रुपये आणि एक वर्षाचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी 399 रुपये द्यावे लागतील.

First published:
top videos

    Tags: Airtel, Recharge