मुंबई, 29 फेब्रुवारी : jio टक्कर देण्यासाठी एअरटेल टेलिकॉम लिमिटेड कंपनीने ग्राहकांसाठी काही खास प्लान लाँच केले आहेत. या प्लानचा भारतातील नागरिकांनाच नाही तर विदेशात फिरायला जाणाऱ्या भारतीय नागरिकांनाही होणार आहे. पोस्टपेड आणि प्रिपेड असे दोन्ही ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग प्लानचा समावेश करून हे प्लान आपल्या मोबाईलवर घेऊ शकतात.
जाणून घ्या काय आहेत jio आणि vodafone कंपनीला टक्कर देण्यासाठी Airtelचे खास प्लान
799- या प्लानमध्ये जगभरात सफर करणाऱ्यांसाठी 100 मिनिटं आणि 30 दिवसांसाठी अनिलिमिटेड कॉलिंग त्यांच्या सर्कलमध्ये आणि SMSची सुविधा मिळणार आहे.
1199- या प्लानमध्ये 1GB डेटा सोबत भारत आणि इतर देशांमध्ये 100 मिनिटं फ्री मिळणार आहेत. याची वैधता 30 दिवसांसाठी असणार आहे. यासोबत SMSची सुविधा मिळणार आहे.
4999 रुपये- या प्लानमध्ये 1 GB डेटा दर दिवशी आणि अनलिमिटेड कॉल भारत आणि यासह इतर देशांमध्ये मिळणार आहेत. याशिवाय 500 मिनिटं आऊटगोईंग कॉलची सुविधा असणार आहे. हा प्लान येत्या काही दिवसांत लाँच होणार आहे.
हेही वाचा-Vodafone Idea ची सेवा महागणार, एक एप्रिलपासून नवे दर?काय आहेत या प्लानचे फायदे-
जर ग्राहक आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकमध्ये मिळणारे फायदे काढून टाकणार असतील तर डेटा बंद होईल, जेणेकरून जास्त वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक एअरटेल थँक्स अॅपवर जाऊन दुसरे पॅक किंवा टॉप अप मिळवू शकतात.
एअरटेलचे पोस्टपेड ग्राहक आता त्यांची आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवेचा अधिक चांगला लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना एअरटेल थँक्स अॅपवर जाऊन फक्त एका क्लिकवर जावे लागेल.
एअरटेलचे प्रीपेड ग्राहक आता प्रवासाच्या तारखेच्या 30 दिवस आधी आधी आंतरराष्ट्रीय रोमिंग अॅप खरेदी करू शकतात. यामध्ये, पॅकची वैधता त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट झाल्यानंतरच सुरू होईल.
या व्यतिरिक्त एअरटेलने ग्राहकांसाठी नवीन ग्लोबल प्लान बाजारात आणले आहेत. हे प्लान ज्या देशांमध्ये सर्वाधिक प्रवास करतात त्यांना कव्हर करेल. याद्वारे, लोक एका प्लानवर जगभर प्रवास करू शकतील.
हेही वाचा-अत्याधुनिक फीचर्सची मेड इन इंडिया बाइक - Kridn काय आहे किंमत आणि वैशिष्ट्य?
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.