अत्याधुनिक फीचर्सची मेड इन इंडिया बाइक - Kridn काय आहे किंमत आणि वैशिष्ट्य?

अत्याधुनिक फीचर्सची मेड इन इंडिया बाइक - Kridn काय आहे किंमत आणि वैशिष्ट्य?

इलेक्ट्रिक बाइकच्याा जमान्यात नवी, आधुनिक मेड इन इंडिया बाईक लवकरच लाँच होते आहे. क्रिडन नावाची ही बाईक कशी असेल आणि याची किंमत काय?

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी - सध्या जमाना आहे पर्यावरण रक्षणाचा, अपारंपारिक ऊर्जा वापरून प्रदूषण करण्याचा आणि यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. हेच लक्षात घेऊन नोएडा इथल्या वन इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे.  पुढच्या महिन्याभरात या बाईकरून तुम्ही खास राईड करु शकता. कारण मार्च 2020 मध्ये इलेक्ट्रिक बाईक बाजारात येणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून यावर काम सुरू होतं. या बाईकला क्रिडन असं नाव देण्यात आलं आहे.

काय आहे 'क्रिडन' मध्ये खास?

क्रिडन हा मूळ संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ आहे खेळ खेळणं. खास रेट्रो लुक ची ही बाईक खासकरून भारतीय रस्त्यांसाठी तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या या बाईक च्या काही शेवटच्या चाचण्या सुरु आहेत. अर्थात भारतीय रस्ते इतके भारी आहेत की ही नवी इलेक्ट्रिक बाईक त्यावर उत्तम चालते का हे चालवल्यानंतरच कळू शकेल.

कशी आहे 'क्रिडन' ?

त्याचा हँडल बार सरळ आणि उंचावलेला आहे. लांब अन् एकच सिट, मध्यम ठेवलेल्या फूट-पेग्स रायडर त्रिकोणी आणि आरामदायक असेल यात शंकाच नाही. या बाईकची क्षमता 125 cc ICE बाईकसारखीच असेल. स्पोर्टस बाईकची आवड असणाऱ्यांना कदाचित क्रिडन फार आकर्षक वाटणार नाही, पण बाजारातले ट्रेण्ड आणि मागणी लक्षात घेऊन ती तयार करण्यात आल्याचा उत्पादकांचा दावा आहे. गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 80 ते 120 किलोमीटरपर्यंत अगदी सहज जाऊ शकते. इंजिनची क्षमता कोणत्याही आधुनिक बाईक पेक्षा कमी नाही. अवघ्या 6 ते 8 सेकंदात ही 'क्रिडन' बाईक 60 किमीचा वेग गाठू शकते. या नव्या इ बाईकचं लॉन्च मार्चमध्ये नवी दिल्ली, जयपूर, हैदराबाद, बंगळुरू आणि पुण्यात होणार आहे. तरुणाईच्या सध्याच्या ट्रेंण्डला साजेश्या असलेल्या या बाईक ची किंमत एक्स शोरूम 90 हजार ते एक लाख दहा हजाराच्या दरम्यान असेल. तेंव्हा या नव्या पर्यावरण प्रेमी इ-बाईक क्रिडनच्या स्वागताला तयार राहा.

हे जरूर वाचा : कुणीतरी आहे तिथे... भारतीय शास्त्रज्ञाला पृथ्वीसारखाच आणखी एक ग्रह सापडला

First published: February 28, 2020, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading