मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन; 19 रुपयांत मिळेल फ्री कॉलिंग आणि इंटरनेट डेटा

Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन; 19 रुपयांत मिळेल फ्री कॉलिंग आणि इंटरनेट डेटा

रिचार्ज करताना अधिकतर लोक प्रत्येक कंपनीच्या प्लॅनची किंमत आणि फायदे पाहतात. अनेकदा अधिक फायदे नको असतात, पण केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज हवा असतो. एयरटेलने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक स्वस्त प्लॅन आणला आहे.

नवी दिल्ली, 13 मार्च : टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन बाजारात आणतात. रिचार्ज करताना अधिकतर लोक प्रत्येक कंपनीच्या प्लॅनची किंमत आणि फायदे पाहतात. अनेकदा अधिक फायदे नको असतात, पण केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज हवा असतो. एयरटेलने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्यात ग्राहकांना कमी किंमतीत फ्री कॉलिंगचा फायदा घेता येऊ शकतो.

एयरटेल प्रीपेड रिचार्ज लिस्टमध्ये 19 रुपयांचा स्वस्त प्लॅन ऑफर करते, जो ग्राहक फ्री कॉलिंगसाठी रिचार्ज करू शकतात.

एयरटेलने हा प्लॅन ‘Truly Unlimited’ कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग मिळतं. इतक्या कमी किंमतीत Unlimited Call सारखा बेनिफिट अतिशय फायदेशीर ठरतो. परंतु ग्राहकांना या प्लॅनच्या वॅलिडिटीवर नाराजी असू शकते. या प्लॅनची वॅलिडिटी केवळ दोन दिवस आहे. एयरटेल ग्राहक 19 रुपयांचा रिचार्ज करुन दोन दिवस मोफत कॉलिंगची सुविधा घेऊ शकतात.

(वाचा - Airtel प्लॅन: केवळ 1 रुपया अधिक देऊन मिळवा 28 दिवसांची एक्स्ट्रा वॅलिडिटी)

दुसरीकडे यात ग्राहकांना 200 MB इंटरनेट डेटा देण्यात येतो. यात फ्री SMS ची सुविधा नाही. परंतु केवळ कॉलिंगसाठी हा सर्वात स्वस्त आणि चांगला प्लॅन ठरू शकतो.

(वाचा - आता फोनमध्ये सिम कार्ड टाकण्याची गरज नाही;Airtelची नवी सर्विस अशी करा अ‍ॅक्टिवेट)

दरम्यान, टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने (Bharti Airtel) ग्राहकांसाठी ई-सिम (eSIM) ही एक नवी सर्विस आणली आहे. या नव्या सर्विसमुळे लोक आता फोनमध्ये विना फिजिकल सिम कार्ड टाकल्याशिवायच कॉल आणि इंटरनेट सर्विसचा आनंद घेऊ शकतील. एयरटेल युजर्स हे ई-सिम कोणत्याही एयरटेल स्टोरमधून घेऊ शकतात.

First published:

Tags: Airtel, Prepaid