Airtel चा सर्वात स्वस्त प्लान; केवळ 19 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

Airtel चा सर्वात स्वस्त प्लान; केवळ 19 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

एअरटेलचा हा 19 रुपयांचा बजेट रिचार्ज प्लान चर्चेत आहे. Airtel ने त्यांचा हा स्वस्त 19 रुपयांचा प्लान ‘Truly Unlimited’ कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : फोनमध्ये रिचार्ज करताना अनेकदा स्वस्त प्लान (Recharge Plans), ज्यात कमी किंमतीत चांगले-अधिक फायदे मिळतील असं पाहिलं जातं. टेलिकॉम कंपन्या आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लान बाजारात आणत असतात. आता स्वस्त रिचार्जच्या शोधात असाल, तर कंपनीने एक 19 रुपयांत स्वस्त प्लान ऑफर केला आहे, ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हा प्लान रिचार्ज करू शकतात. एअरटेलच्या (Airtel) या स्वस्त प्लानमध्ये फ्री कॉलिंगसह (free calling) इतरही काही फायदे देण्यात येत आहेत.

एअरटेलचा हा 19 रुपयांचा बजेट रिचार्ज प्लान चर्चेत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा स्वस्तातला प्लान लाँच केला आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना हा स्वस्त प्लान ऑफर करत, त्यात काही चांगले बेनिफिटही दिले आहेत.

(वाचा - Netflix फ्रीमध्ये पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कटेन्ट)

Airtel ने त्यांचा हा स्वस्त 19 रुपयांचा प्लान ‘Truly Unlimited’ कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे. फ्री कॉल ही या प्लानची खास बाब आहे. इतक्या कमी रुपयांत Unlimited Call सारखं बेनिफिट अतिशय फायदेशीर आहे.

(वाचा - तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय?हॅकिंगची शक्यता; या वर्षातील बिनकामाचे 20 पासवर्ड)

पण या प्लानमध्ये देण्यात आलेली वॅलिडिटी अतिशय कमी आहे. या प्लानची वैधता केवळ 2 दिवस आहे. एअरटेल ग्राहक 19 रुपयांच्या रिचार्जमध्ये दोन दिवस फ्री कॉलिंग करू शकतात. यात ग्राहकांना 200MB इंटरनेट डेटा वापरता येणार आहे. या प्लानमध्ये फ्री SMS ची सुविधा देण्यात आलेली नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: November 21, 2020, 11:50 AM IST

ताज्या बातम्या