मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone 13 आणि iPhone 13 Pro वर नो कॉस्ट EMI, मिळवा कॅशबॅकही

iPhone 13 आणि iPhone 13 Pro वर नो कॉस्ट EMI, मिळवा कॅशबॅकही

महाग असलेले आयफोन्स आणखी महागात पडतात; मात्र नवीन लाँच झालेले आयफोन घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) एक जबरदस्त ऑफर आणली आहे.

महाग असलेले आयफोन्स आणखी महागात पडतात; मात्र नवीन लाँच झालेले आयफोन घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) एक जबरदस्त ऑफर आणली आहे.

महाग असलेले आयफोन्स आणखी महागात पडतात; मात्र नवीन लाँच झालेले आयफोन घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) एक जबरदस्त ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी अ‍ॅपल कंपनीने आयफोन सीरिजमधल 'आयफोन 13' (iPhone 13) आणि 'आयफोन 13 प्रो' (iPhone 13 Pro) हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. अ‍ॅपल इंडियाच्या (Apple India) अधिकृत वेबसाइटवरच्या माहितीनुसार आयफोन 13ची किंमत 69 हजार 900 रुपये, तर आयफोन 13 प्रो ची किंमत 1 लाख 19 हजार 900 रुपये आहे. अनेकांना हे नवीन आलेले आयफोन्स घेण्याची इच्छा तर आहे; मात्र ते फोन्स खूप महाग आहेत. ईएमआयवर घ्यायचे असले, तर त्यावर व्याज भरावं लागत असल्याने अगोदरच महाग असलेले आयफोन्स आणखी महागात पडतात; मात्र नवीन लाँच झालेले आयफोन घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) एक जबरदस्त ऑफर आणली आहे. 'झी बिझनेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेचे जे ग्राहक आयफोन 13 किंवा आयफोन 13 प्रो खरेदी करण्यास इच्छुक आहेत, ते कार्डचा वापर करून फोन घेऊ शकतात. बँक त्यांना सहा महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय सुविधा देत आहे. इतकंच नाही तर सोबत 6 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकदेखील (Cashback) मिळणार आहे. एचडीएफसी बँकेच्या या विशेष ऑफरमध्ये, आयफोन 13 खरेदी केल्यास 5 हजार रुपयांचा आणि आयफोन 13 प्रो खरेदी केल्यास 6 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हेही वाचा- नवी कार घ्यायचा विचार करताय? Honda Cars वर बंपर डिस्काउंट; 53,500 रुपयांपर्यंत होईल बचत या ऑफरअंतर्गत, अ‍ॅपलच्या प्रीमियम रीसेलर आणि अधिकृत रीसेलर स्टोअरमधून आयफोन 13 आणि आयफोन 13 प्रो हे हँडसेट खरेदी करता येतील. ही ऑफर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास, तसंच डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरून नो कॉस्ट ईएमआय स्वरूपात खरेदी केल्यास आणि कंझ्युमर लोनअंतर्गत खरेदी केल्यास लागू आहे. या वर्षाअखेरीस म्हणजेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत एचडीएफसी बँकेच्या या विशेष ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. हेही वाचा- 1.5 अब्ज Facebook Users चा डेटा लीक; वापरकर्त्यांची खासगी माहिती विकतीये ही कंपनी, काय आहे प्रकरण?
 या खरेदीचे काही आणखी फायदेदेखील आहेत. आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 ची खरेदी कार्डवरून केल्यास आणि नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय स्वीकारल्यास 6 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि सहा ईएमआय भरावे लागतील. याच फोन्सची खरेदी कंझ्युमर लोनअंतर्गत केल्यास कॅशबॅक मिळणार नाही; मात्र 24 ईएमआयमध्ये परतफेड करता येईल. आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 मॅक्सची खरेदी कार्डवरून केल्यास आणि नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय स्वीकारल्यास खरेदीवर 5 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. सोबत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नो कॉस्ट ईएमआय सुविधा मिळेल.
First published:

Tags: Hdfc bank, Iphone

पुढील बातम्या