नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : कोरोना काळात चिंता, डिप्रेशनची (Depression) प्रकरणंही वाढली आहेत. अशात राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील एम्सने (AIIMS) मानसिक रुग्ण आणि त्यांची देखभाल करणाऱ्यांसाठी दोन मोबाईल अॅप (Mobile App) विकसित केले आहेत. हे अॅप गंभीर मानसिक आजाराने पीडित लोकांसह अशा लोकांसाठीही फायदेशीर ठरेल, ज्यांना आजाराशी संबंधित लक्षणांची नुकतीच माहिती मिळाली आहे. एम्सकडून विकसित केलेल्या दोन मोबाईल अॅप्सला सक्षम आणि दिशा अशी नावं देण्यात आली आहेत. एम्सचे वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) ममता सूद यांनी सांगितलं, की सक्षम अॅप अशा लोकांसाठी आहे, जे जुन्या दिर्घकालीन मानसिक आजाराने पीडित आहेत. तर दिशा अॅप या आजाराशी संबंधित लक्षणं दिसणाऱ्या लोकांसाठी आहे. दोन्ही अॅप इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली आणि यूनिव्हर्सिटी ऑफ वारविक, ब्रिटनच्या कंप्यूटर विज्ञान विभागाच्या मदतीने विकसित केले आहेत. या अॅपसाठी ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चद्वारा फंड देण्यात आला आहे. ममता सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अॅप पुढील वर्षी जानेवारीपासून मोफत सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध होईल. अॅप रुग्णांना औषधं आणि इतर गरजांची देखभाल करण्यासाठी रिमाइंडर पाठवेल. मानसिक समस्यांबाबत बोलताना ममता सूद यांनी, आरोग्य सेवेतील 50 टक्के कर्मचारी चिंता, तणाव आणि नैराशासारख्या लक्षणांचा सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
AC भिंतीच्या वरच्या बाजूलाच का लावतात; खाली लावला तर काय होईल?
कोरोना काळात अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे अचानक अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाले. अशात अनेक जणांच्या मानसिक आरोग्यांवर परिणाम झाल्याचं, डिप्रेशनमध्ये गेल्याची प्रकरणं समोर आली. केवळ सर्वसामान्यच नाही, तर याचा फटका सिनेसृष्टीतीलही अनेकांना बसला. मानसिक आरोग्याचं महत्त्व लक्षात घेता, दिल्लीतील एम्स रुग्णालयाने उचललं हे पाउल महत्त्वपूर्ण ठरू शकतं.