जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आत्मनिर्भर भारतच्या दिशेने आणखी एक पाऊल, आता भारतातच तयार होणार Amazon फायर टीव्ही स्टिक

आत्मनिर्भर भारतच्या दिशेने आणखी एक पाऊल, आता भारतातच तयार होणार Amazon फायर टीव्ही स्टिक

आत्मनिर्भर भारतच्या दिशेने आणखी एक पाऊल, आता भारतातच तयार होणार Amazon फायर टीव्ही स्टिक

‘चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लाइन सुरू करण्याच्या अ‍ॅमेझॉनच्या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या संधी (Job Opportunities) निर्माण होतील. यामुळे आत्मनिर्भर आणि डिजिटल इंडिया या मोहिमेस बळकटी मिळेल’

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या (Central Government) आत्मनिर्भर भारत अभियानाला ॲमेझॉनकडून (Amazon) मोठा पाठिंबा मिळाला आहे. 2021 च्या अखेरपर्यंत ॲमेझॉन आपलं फायर टीव्ही स्टिकचं (fire tv stick) उत्पादन भारतातच घेण्यास सुरुवात करणार आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी ही माहिती दिली. ‘चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लाइन सुरू करण्याच्या अ‍ॅमेझॉनच्या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या संधी (Job Opportunities) निर्माण होतील. यामुळे आत्मनिर्भर आणि डिजिटल इंडिया या मोहिमेस बळकटी मिळेल’, असं ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेला थेट हातभार लागेल - केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘भारत गुंतवणूकीचं आकर्षक ठिकाण आहे. तसंच, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी उत्पादनाच्या उद्योगामध्ये जागतिक पुरवठा साळखीमध्ये एक प्रमुख देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन योजना (पीएलआय) सुरू करण्याच्या आमच्या सरकारच्या निर्णयाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.’ ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड अमित अग्रवाल म्हणाले की, ‘हे पाऊल मेक इन इंडियाबद्दलच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करतं. हे पाऊल भारतीय अर्थव्यवस्थेला थेट हातभार लावत असून रोजगार निर्मिती करत आहे.’

(वाचा -  FASTag असूनही ‘या’ कारणामुळे भरावा लागू शकतो दुप्पट टोल )

वर्षाच्या अखेरीस सुरू होईल उत्पादन - अमित अग्रवाल पुढे म्हणाले, ‘ॲमेझॉन कंपनी हे काम मॅन्युफॅक्चरिंग, पार्टनर फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपसोबत करणार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत चेन्नईमध्ये उत्पादनाला सुरुवात होईल. फायर टीव्ही डिव्हाइस उत्पादन कार्यक्रम भारतातील ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात फायर टीव्ही स्टिक डिव्हाइसचं उत्पादन करण्यास सक्षम राहिल.’ दरम्यान, ॲमेझॉन भारतामध्ये सूक्ष्म आणि लघू उद्योगांना डिजिटल करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. या माध्यमातून त्यांना पहिल्यापेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: amazon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात