जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhar Card वर किती सिम घेता येतात? अनधिकृत Sim कशी बंद करावी? फॉलो करा प्रोसेस

Aadhar Card वर किती सिम घेता येतात? अनधिकृत Sim कशी बंद करावी? फॉलो करा प्रोसेस

Aadhar Cardवर किती सिम घेता येतात? अनधिकृत Sim कसं बंद करावे? फॉलो करा प्रोसेस

Aadhar Cardवर किती सिम घेता येतात? अनधिकृत Sim कसं बंद करावे? फॉलो करा प्रोसेस

Sim issued on Aadhar Card : सिम मिळविण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे खूप महत्वाचं आहे की तुम्ही एका आधार कार्डवर किती सिम घेऊ शकता? या गोष्टीची आपल्याला माहिती नसते, त्यामुळं अनेकवेळा फसवणूकीच्या घटनाही समोर येतात.

  • -MIN READ Simaluguri,Sivasagar,Assam
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै: आधार कार्ड (Aadhar Card) हे केवळ बँकेच्या कामात वापरलं जाणारं कागदपत्र नसून ते ओळखपत्र म्हणून सर्वत्र वापरलं जात आहे. सिम मिळविण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे खूप महत्वाचं आहे की तुम्ही एका आधार कार्डवर किती सिम घेऊ शकता? या गोष्टीची आपल्याला माहिती नसते, त्यामुळं अनेकवेळा फसवणुकीच्या घटनाही समोर येतात. त्यामुळे आधार कार्डवर किती सिम (Sim) जारी केले जाऊ शकतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आज आपण एका आधार कार्डवर तुम्ही किती सिम कार्ड घेता येऊ शकतात, या गोष्टीची माहिती घेणार आहोत. याशिवाय तुमच्या आधारवर घेतलेलं सिम जर तुम्ही वापरत नसाल तर ते सिम तुम्ही बंदही करू शकता.  यासाठी तुम्हाला दूरसंचार विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइच्या मदतीने तुम्ही कोणत्याही आधार कार्डवर घेतलेल्या सिमची संख्या जाणून घेऊ शकता. यासोबतच जे सिम तुम्ही वापरत नाही, ती बंददेखील करू शकता. तुमच्या आधारकार्डवर किती सिम घेतली गेली आहेत, हे कसं पाहायचं? (How to check  sims taken on Aadhar card?)

  • सर्वप्रथम तुम्हाला DoT वेबसाइट tafcop.dgtelecom.gov.in वर जावं लागेल.
  • यानंतर तुम्हाला आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल आणि ओटीपीसाठी विनंती करावी लागेल.

हेही वाचा:  e-PAN Card: 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही डाउनलोड करता येतं ई-पॅनकार्ड, फॉलो करा ही प्रोसेस

  • आता फोनवर मिळालेला OTP टाकावा लागेल.
  • सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक दाखवले जातील.
  • तुम्हाला एखादा अनोळखी किंवा अनधिकृत नंबर ब्लॉक करायचा असेल तर तुम्ही त्याची विनंती देखील करू शकता.

आधारकार्डवर किती सिम घेता येतात? (How many sims can be taken on one Aadhar card?) दूरसंचार विभागाच्या वेबसाइटनुसार, तुम्ही एका आधार कार्डवर 9 सिम जारी करू शकता. तुम्ही वेबसाइटवर सक्रिय सिमची संख्या देखील पाहू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला अनधिकृत नंबर बंद करायचा असेल तर तुम्ही ब्लॉक आणि रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करू शकता. सिम तपासण्याची सुविधा सध्या सर्व राज्यांसाठी उपलब्ध नाही. पण, लवकरच ती सर्व राज्यांना उपलब्ध करून दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात