जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आधार कार्डमध्ये वारंवार ही गोष्ट बदलू शकत नाही, अपडेट करण्याचे नियम पाहा

आधार कार्डमध्ये वारंवार ही गोष्ट बदलू शकत नाही, अपडेट करण्याचे नियम पाहा

आधार कार्डमध्ये वारंवार ही गोष्ट बदलू शकत नाही

आधार कार्डमध्ये वारंवार ही गोष्ट बदलू शकत नाही

Aadhaar Update : आधार कार्डमध्ये काही चुकीची माहिती टाकली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता. आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर : आधार कार्ड आज एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकवेळा आधार तयार करताना चुकीची टाकली जाते किंवा ती अपूर्ण असते. त्यामुळे आधार कार्ड वापरताना नंतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे आधारमध्ये सर्व माहिती पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया देखील लोकांना त्यांचे आधार अपडेट करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करते. आधार हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनल्यामुळे आता तुमच्या आधारमध्ये टाकलेली प्रत्येक माहिती अचूक आणि खरी असणे आवश्यक झाले आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI, आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, लिंग इत्यादी माहिती बदलण्याची सुविधा देते. कोणते अपडेट तुम्ही किती वेळा करू शकता ते जाणून घ्या. नाव दोनदा बदलण्याची परवानगी आधार कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर त्या करू शकतात. UIDAI ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये नाव बदलण्याची परवानगी देते. पण, आधार कार्डमधील नाव अपडेट फक्त दोनदाच करता येईल. वाचा - Aadhar Card Update: UIDAI ची खास योजना, आता आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल लिंग फक्त एकदाच बदलता येते जर तुमचे लिंग आधार कार्डमध्ये चुकीचे टाकले गेले असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. UIDAI च्या नियमांनुसार यामध्ये बदल केले जाऊ शकतात. UIDAI आधार कार्डमध्ये जेंडर अपडेट करण्याची फक्त एक संधी देते. जन्मतारीख एकदाच बदला UIDAI नुसार, आधार कार्डमध्ये जर एखाद्या व्यक्तीने चुकीची जन्मतारीख टाकली असेल तर ती एकदाच अपडेट केली जाऊ शकते. त्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

ही माहिती किती वेळा अपडेट करा आधारमध्ये तुम्ही तुमच्या घराचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, फोटो, फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन वारंवार अपडेट करू शकता. त्यांना अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात