जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhar Card Update: UIDAI ची खास योजना, आता आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल

Aadhar Card Update: UIDAI ची खास योजना, आता आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल

आधार कार्ड

आधार कार्ड

आधार कार्ड हे सध्याच्या काळातलं सर्वांत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुमचं आधार कार्ड नसेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी येतात. कारण, या कार्डशिवाय तुम्ही कोणतंही काम सहजासहजी करू शकत नाही.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : आधार कार्ड हे सध्याच्या काळातलं सर्वांत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुमचं आधार कार्ड नसेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी येतात. कारण, या कार्डशिवाय तुम्ही कोणतंही काम सहजासहजी करू शकत नाही. अगदी फोनचं सिम कार्ड घेण्यापासून, बँक अकाउंट उघडायचं असेल, एखाद्या सरकारी योजनेसाठी अर्ज करायचा असेल किंवा गॅस सिलिंडर घ्यायचा असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. याशिवाय आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करून घेणंही गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने मोठा निर्णय घेऊन बायोमेट्रिक अपडेटबाबत महत्त्वपूर्ण सल्ला नागरिकांना दिला आहे. या संदर्भातलं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. बायोमेट्रिक अपडेट करा यूआयडीएआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राज्यांना आधारबाबत व्याप्ती वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. UIDAI ने म्हटलं आहे, की सर्वांना दर 10 वर्षांनी त्यांचं आधार आणि बायोमेट्रिक्स अपडेट करण्यास प्रोत्साहित करा, जेणेकरून प्रत्येक जण आपापलं आधार अपडेट ठेवेल; मात्र यासाठी कोणतीही सक्ती नसेल, हा फक्त सल्ला आहे. हेही वाचा -  Whatsapp युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फीचर; Create Call Link ने अनेक गोष्टी होणार सोप्या तुमचा डेटा सुरक्षित राहील यूआयडीएआयने सांगितलं की असं केल्याने बनावट आधारसारख्या बाबी बंद होतील. तसंच प्रत्येकाचा डेटादेखील पूर्णपणे सुरक्षित राहील. यूआयडीएआयने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार, कोणतीही व्यक्ती त्याच्या/तिच्या मर्जीने दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक्स आणि डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करू शकते. सध्या यासाठी कोणतेही नियम जारी करण्यात आलेले नाहीत. हा सध्या नागरिकांसाठी फक्त एक प्रकारचा सल्ला आहे. आधार अपडेट करणं सर्वांसाठी महत्त्वाचं तुम्ही आता सेवा केंद्रावर जाऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. आजकाल सर्वत्र आधार कार्ड आवश्यक असल्याने आधार कार्ड अपडेटेड ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला केवायसी करायचं असेल, परीक्षेसाठी किंवा कोणत्याही सरकारी कामासाठी अर्ज करायचा असेल, तर आधार कार्डची माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. तसं न झाल्यास लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आधार कार्डमध्ये तुमची सर्व प्रकारची माहिती असते. ते तुमचं ओळखपत्र आहे. त्यामुळे ते वेळोवेळी अपडेट करणं खूप महत्त्वाचं असतं. आधार कार्ड नसेल किंवा असूनही ते अपडेटेड नसेल, तर अनेक कामं खोळंबू शकतात आणि अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यूआयडीएआय कोणताही नवीन निर्णय घेतल्यानंतर किंवा नवीन अपडेट आल्यानंतर तातडीने नागरिकांना त्यांचं आधार अपडेट करण्याचा सल्ला देत असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात