मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अंधारही आरोग्यासाठी महत्त्वाचा, तर कृत्रिम प्रकाशामुळे वाढतं प्रदूषण, वाचा सविस्तर

अंधारही आरोग्यासाठी महत्त्वाचा, तर कृत्रिम प्रकाशामुळे वाढतं प्रदूषण, वाचा सविस्तर

सूर्यास्तानंतर होणारा नैसर्गिक अंधार शरीरासाठी उपयुक्त असतो, याचा शरीराला कसा होतो फायदा? जाणून घ्या

सूर्यास्तानंतर होणारा नैसर्गिक अंधार शरीरासाठी उपयुक्त असतो, याचा शरीराला कसा होतो फायदा? जाणून घ्या

सूर्यास्तानंतर होणारा नैसर्गिक अंधार शरीरासाठी उपयुक्त असतो, याचा शरीराला कसा होतो फायदा? जाणून घ्या

मुंबई 20 सप्टेंबर : सध्या जर्मनीत शहरांमधल्या प्रमुख इमारती, स्मारकं आणि प्रमुख ठिकाणी असलेले दिवे रात्री बंद करण्यात येतात. घरांमध्येही नागरिक लवकर दिवे बंद करतात. काही ठिकाणी तर सूर्यास्तानंतर विजेवरचे दिवे लावलेच जात नाहीत. तसे पाहाता काही ठिकाणी वीज पुरवठा नसल्यामुळे किंवा वीज वाचवण्यासाठी दिवे लावले जात नाही. परंतू असं करण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे सूर्यास्तानंतर होणारा नैसर्गिक अंधार शरीरासाठी उपयुक्त असतो, हे नव्या संशोधनानुसार सिद्ध झालं आहे. कृत्रिम प्रकाश पर्यावरणाचं प्रदूषण करतो आणि जैवविविधतेसाठी हानिकारक असतो, असं मानणाऱ्यांचा मोठा वर्ग युरोप आणि अमेरिकेत तयार होतो आहे. जर्मनीत तर यादृष्टीनं पावलंही उचलायला सुरुवात झाली आहे. विजेच्या अधिक वापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यासाठी पैसाही भरपूर खर्च होतो. भारतात दर वर्षी 12 मिलियन टन कार्बन डाय ऑक्साइडचं उत्सर्जन होतं. विजेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे उत्सर्जित होणाऱ्या वायूंमुळे हवामानबदलालाही हातभार लागतो आहे. म्हणून रात्रीच्या वेळी विजेवर चालणाऱ्या दिव्यांचा वापर कमी केल्यास वीज व पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल. जगातली अनेक मोठमोठी शहरं रात्री दिव्यांच्या आकर्षक रोषणाईनं झळाळत असतात. टोकियो आणि सिंगापूरमध्ये तर रात्री इतका झगमगाट असतो, की नागरिकांना इच्छा असूनही रात्रीचा अंधार अनुभवायला मिळत नाही. युरोप, अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. डॅश वॅलेच्या एका रिपोर्टनुसार, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रात्रीचा अंधार उपयुक्त असतो. रात्रीच्या अंधारातली झोप शरीरस्वास्थ्यासाठीही उपयुक्त असते. विजेवरच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे डोळ्यांमध्ये जखमा होणं, निद्रानाश, लठ्ठपणा असे अनेक आजार मागे लागू शकतात, असं संशोधन सांगतं. रात्री झोपल्यामुळे अनेक फायदे होतात. अनेक जण साधारणपणे 6 ते 9 तास झोपतात. ही झोप शांत आणि दर्जेदार असावी असं वाटत असेल, तर ती अंधारात घ्यायला पाहिजे, असं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड वेलफेअरचे संशोधक प्राध्यापक टिमो पार्टोनन यांनी म्हटलं आहे. रात्रीच्या झोपेमुळे रक्तदाब नीट राहतो. वजनवाढीवर नियंत्रण राहतं. मेंदूची कार्यक्षमता उत्तम राहते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे डायबेटीस होऊ नये म्हणून रात्रीच्या अंधारातली झोप उपयुक्त असते. झोपलेलं असताना दिवा चालू ठेवल्यामुळे डायबेटिसचा धोका वाढू शकतो असं नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीनं केलेल्या एका अभ्यासात समोर आलंय. तीव्र प्रकाशात झोपल्यामुळे शरीरातल्या इन्सुलिन निर्मितीला विरोध होतो. तसंच झोप शांत नसल्यास चयापचयाशी निगडित अनेक आजार मागे लागू शकतात. डिप्रेशन, स्तनांचा किंवा प्रोस्टेट कर्करोग यामागेही चांगल्या झोपेचा अभाव हे कारण असू शकतं. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता शरीरात निर्माण होते. तसंच अंधारात न झोपल्यामुळे शरीरात मिलेटोनिन या हॉर्मोनची कमतरता निर्माण होते. यामुळे शरीरात अनेक आजार निर्माण होतात. हे हॉर्मोन अंधारातच तयार होतं. “काही जण शिफ्टमध्ये काम करतात त्यांच्या किंवा इतरांच्या शरीरात हे हॉर्मोन तयार झालं नाही, तर शरीराचं नैसर्गिक चक्र बिघडतं आणि अनेक समस्या निर्माण होतात,” असं जर्मन रिसर्च सेंटर फॉल जिओसायन्सचे शास्त्रज्ञ क्रिस्टोफर क्याबा यांचं मत आहे. याच संदर्भात अमेरिकेत 2020मध्ये मुलांबाबत एक संशोधन करण्यात आलं. त्यानुसार कृत्रिम प्रकाशात अधिकाधिक राहणाऱ्या लहान किंवा किशोर वयातल्या मुलांना (Effect Of Artificial Light On Human Being ) झोप कमी येते. भविष्यात त्यांना मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो, असं आढळून आलं. कृत्रिम प्रकाशाचा मनुष्यावर परिणाम होतो तसाच प्राण्यांवर, वनस्पतींवरही होतो. या प्रकाशात असणाऱ्या इतर जिवांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. समुद्रातल्या प्रवाळांमध्ये प्रजननक्षमता कमी होते, स्थलांतरी पक्षी त्यांची फिरण्याची प्रवृत्ती गमावू शकतात, जन्म झाल्याक्षणी पाण्यात जाण्याऐवजी अनेक सुसरी जमिनीवर हिंडू लागतात, यामुळे त्यांचा मृत्यूही होतो. अंधार सर्वांसाठीच गरजेचा आहे. यामुळे एक प्रकारची नैसर्गिक लय निर्माण होते, असं फिनलँड एनव्हायर्नमेंट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक जेरी लितिमाकी यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये लिहिलं आहे. वटवाघळं, अंधारात वावरणारे काही जीव आणि किडे यांनाही विजेच्या दिव्यांचा त्रास होतो. जर्मनीत उन्हाळ्यात कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उडणारे जवळपास 100 अब्ज किडे दर वर्षी मरतात असं एका संशोधनात आढळलं आहे. रस्त्यावरच्या दिव्यांच्या आसपास असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये रात्री परागीभवन कमी होतं. यामुळेच या झाडांना तुलनेत कमी फळं-फुलं येतात. मोठमोठ्या वृक्षांवरही दिव्यांच्या प्रकाशाचा परिणाम होतो. त्यांच्यावर कळ्या आधी येतात त्यानंतर पानं झडतात. रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात किंवा संगणकावर काम करण्यानं ताण वाढतो. रात्री दिव्यांच्या प्रकाशात झोपल्यानं शरीराची लय बिघडते. ओहयो स्टेट युनिव्हर्सिटी रुग्णालयात याबाबत संशोधन करण्यात आलं. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या उजेडात झोपल्यामुळे कोणत्या वेळी झोपायचं असतं हे शरीराला कळत नाही. अशा गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडू शकतं. डिप्रेशनही येऊ शकतं. त्यामुळेच अंधारातच झोपण्याची सवय ठेवावी.
First published:

Tags: Marathi news, Pollution, Viral news

पुढील बातम्या