Home /News /technology /

देशातील 6100 रेल्वे स्टेशन्सवर आहे Free WI-FI, वापर करताना जपून; आहे असुरक्षिततेची भीती

देशातील 6100 रेल्वे स्टेशन्सवर आहे Free WI-FI, वापर करताना जपून; आहे असुरक्षिततेची भीती

देशातील 6100 रेल्वे स्टेशन्सवर हाय स्पीड फ्री वाय-फाय इंटरनेट (High Speed Free Wi-Fi Internet) सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा रेलटेलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मात्र या वाय-फायच्या माध्यमातून देण्यात येणारी इंटरनेट सुविधा सुरक्षित नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 25 मार्च: गेल्या काही वर्षांत जवळपास बरेच व्यवहार ऑनलाईन (Online) झाले आहेत. त्यामुळे इंटरनेटचा (Internet) वापर वाढला आहे. स्मार्टफोनमुळे ऑनलाईन सुविधांचा लाभ अगदी सहजपणे घेणं सुलभ झालं आहे. नागरिकांची गरज ओळखून आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन म्हणून सरकारने एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा (Public Wi-Fi or Free Wi-fi) उपलब्ध करुन देण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना ही सेवा मोफत दिली जात आहे. एकीकडे सर्व गोष्टी ऑनलाइन झालेल्या असताना, दुसरीकडे सायबर गुन्हेगारीचा (Cyber Crime) धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर या वाय-फाय सुविधेच्या अनुषंगानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण रेल्वे स्टेशनवर (Railway Station) उपलब्ध होणारी मोफत वाय-फाय सुविधा पुरेशी सुरक्षित नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. देशातील 6100 रेल्वे स्टेशन्सवर हाय स्पीड फ्री वाय-फाय इंटरनेट (High Speed Free Wi-Fi Internet) सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा रेलटेलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. काही हॉल्ट स्टेशन वगळता देशातील 100 टक्के स्टेशन वाय-फाय कव्हरेजअंतर्गत आली आहेत, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. मात्र या वाय-फायच्या माध्यमातून देण्यात येणारी इंटरनेट सुविधा सुरक्षित नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. अर्थात यामागे काही कारणं आहेत. हे वाचा-सावधान! तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाही ना? अशी ओळखा फोनद्वारे होणारी हेरगिरी तज्ज्ञांच्या मते, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर मोफत वाय-फाय स्पॉट्स वापरल्याने तुम्हाला सायबर अ‍ॅटॅकचा धोका असतो. मोफत वाय-फाय वापरादरम्यान सायबर अ‍ॅटॅक झाला आणि असा हल्ला करणारा हॅकर त्यात यशस्वी झाला तर युजरची क्रेडिट कार्ड नंबर, पासवर्ड, चॅट मेसेज, ई-मेल यासारखी महत्त्वाची आणि गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते. काही आपत्कालीन स्थितीत तुम्हाला नाइलाजानं पब्लिक वाय-फायचा वापर करावा लागला तर, अशावेळी ऑनलाईन मनी ट्रान्झॅक्शन (Online Money Transaction) करणं टाळावं. तसंच इंटरनेटचा वापर करुन झाल्यावर तातडीनं वाय-फाय डिस्कनेक्ट करावं, असं तज्ज्ञांनी सांगितलं. बिझनेस स्टॅंडर्डच्या रिपोर्टमध्ये इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) या शासकीय एजन्सीनेदेखील ही वाय-फाय सुविधा धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. पब्लिक वाय-फायच्या तुलनेत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क अर्थात व्हीपीएनचा (VPN) वापर करणं अधिक सुरक्षित आहे, असं या टीमनं सांगितलं. तसेच पब्लिक वाय-फायचा वापर करण्याऐवजी पर्सनल इंटरनेट किंवा वायर्ड इंटरनेटचा वापर युजर्सनं करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हे वाचा-अँड्रॉईड युजर्सासाठी गुगलनं लाँच केलं 'हे' नवीन फीचर, जाणून घ्या अधिक माहिती 'असुरक्षित नेटवर्कमध्ये सेफ्टी फीचर्स नसतात. त्यामुळे असं नेटवर्क वापरणं धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही अनोळखी वाय-फाय वापरत असाल तर अशावेळी ऑनलाईन बँकिंग किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणं टाळा अन्यथा अशा वाय-फायचा वापर तुमच्यासाठी नुकसानदायी ठरु शकतो,' असं सायबराबाद सायबर क्राइमच्या पोलिसांचं म्हणणं आहे.
First published:

Tags: High speed internet, Internet, Internet use

पुढील बातम्या