जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / अँड्रॉईड युजर्सासाठी गुगलनं लाँच केलं 'हे' नवीन फीचर, जाणून घ्या अधिक माहिती

अँड्रॉईड युजर्सासाठी गुगलनं लाँच केलं 'हे' नवीन फीचर, जाणून घ्या अधिक माहिती

अँड्रॉईड युजर्सासाठी गुगलनं लाँच केलं 'हे' नवीन फीचर, जाणून घ्या अधिक माहिती

गुगलच्या या नवीन फीचरचा लाभ घेण्यासाठी अँड्रॉईड युजर्सना प्ले स्टोअरवर जाऊन मोबाईलमधील गुगल अ‍ॅप्लिकेशन अपडेट करावं लागेलं. अपडेट करूनही नवीन फीचर दिसत नसेल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 24 मार्च : इंटरनेट (Internet) हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेलं आहे. इंटरनेटचा वापर करणं हा एक प्रकारचा सौदाच आहे. जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीसोबत (Privacy) काही प्रमाणात तडजोड करावीच लागते. बहुतेक इंटरनेट युजर (Internet User) माहिती शोधण्यासाठी ‘गुगल’चा (Google) वापर करतात. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे. मात्र, याचा वापर कधी-कधी तुम्हाला संकटात टाकू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल अॅपवर (Google app) काहीतरी सर्च केलं. त्यानंतर चार्जिंगच्या किंवा इतर कारणास्तव तो बाजूला ठेवून बाहेर गेलात. तुमच्या अनुपस्थितीमध्ये अचानक एखाद्या मित्रानं किंवा कुटुंबातील सदस्यानं गुगलवर जाऊन तुमची सर्च हिस्ट्री (Search History) चेक केली तर काही वेळापूर्वी तुम्ही काय पाहत होता हे ते त्यांना अगदी सहज कळेल. या गोष्टीमुळे तुमची प्रायव्हसी शाबूत राहत नाही. मात्र, आता येथून पुढे असं होणार नाही. गुगलने अँड्रॉईड (Android) मोबाईल वापरणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे आता अँड्रॉईड युजर्सना शेवटच्या 15 मिनिटांतील सर्च हिस्ट्री डिलीट (Search History Delete) करता येणार आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कंपनी म्हटलंय की, आम्ही अँड्रॉईड फोनमधील गुगल अॅप्लिकेशन्ससाठी ‘डिलीट लास्ट 15 मिनट्स’ (Delete Last 15 Minutes) हे फीचर सादर करत आहोत. येत्या काही आठवड्यांत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे फीचर उपलब्ध होईल, अशी घोषणा गुगलनं केली आहे. गेल्या वर्षी (2021) झालेल्या I/O कॉन्फरन्समध्येच गुगलनं हे फीचर जाहीर केलं होतं. आयएसओ युजर्सना (iOS Users) जुलै 2021 मध्ये हे फीचर मिळालं होतं. आता अँड्रॉईड युजर्ससाठीदेखील हे फीचर रोल आऊट करण्यात आलं आहे. गुगलच्या या नवीन फीचरचा लाभ घेण्यासाठी अँड्रॉईड युजर्सना प्ले स्टोअरवर जाऊन मोबाईलमधील गुगल अ‍ॅप्लिकेशन अपडेट करावं लागेलं. अपडेट करूनही नवीन फीचर दिसत नसेल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. कारण, गुगल हळूहळू आपल्या सर्व युजर्सना हे अपडेट उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही दोन अँड्रॉईड मोबाईलवरून एकच गुगल अकाउंट लॉग इन केलेलं असेल आणि तुम्ही या नवीन फीचरचा वापर केला तर तो दोन्ही मोबाईलसाठी सारखाचं प्रभावी ठरेल. म्हणजेच तुम्ही जर एका मोबाईलमधील गुगल अकाउंटची शेवटच्या 15 मिनिटांतील सर्च हिस्ट्री डिलीट केली तर दोन्ही ठिकाणची हिस्ट्री नाहीशी होईल. त्यामुळे एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर एकच अकाउंट वापरणाऱ्या युजर्ससाठीदेखील हे नवीन फीचर उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, हे नवीन फीचर रोल आऊट झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, सर्च हिस्ट्री आपोआप डिलिट होऊ शकते का? तर, या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. गुगलनं युजर्सना ऑटो डिलीटचा ऑप्शन (Auto-delete) देऊ केला आहे. या ऑप्शनचा वापर करून युजर्स विशिष्ट कालावधी सेट करू शकतात. असं केल्यास सेट केलेल्या कालावधीतील तुमची सर्च हिस्ट्री ऑटोमॅटिक डिलीट होऊ शकते. तुम्ही गुगल अ‍ॅप्लिकेशनच्या सर्च हिस्ट्रीमध्ये गेल्यावर तिथे ऑटो-डिलीटचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘ऑटो डिलीट अॅक्टिव्हिटी ओल्डर दॅन’ (Auto-delete Activity Older Than) हा आणखी एक ऑप्शन दिसेल. ज्यामध्ये 3,18 आणि 36 महिन्यांचं ड्युरेशन दिसेल. यापैकी एक ड्युरेशन ऑप्शन तुम्ही निवडू शकता. निवडलेल्या कालावधीनंतर तुमची गुगल अ‍ॅक्टिव्हिटी आपोआप डिलीट होईल. याचबरोबर तुम्हाला विशिष्ट तारखेची हिस्ट्रीही डिलीट करता येते. त्यासाठी पहिल्यांदा गुगलच्या Search History पर्यायावर जा. खाली दिलेल्या डिलीट बटनावर टॅप करून Delete Custom Range पर्याय निवडा. त्यात After आणि Before हे पर्याय वापरून तुम्हाला हव्या असलेल्या तारखा त्यात टाका म्हणजे त्या तारखांदरम्यानची हिस्ट्री तुम्हाला डिलीट करता येईल. जे लोक आपल्या गुगल प्रायव्हसीबाबत खूपच पर्टीक्युलर आहेत, अशा युजर्ससाठी गुगलचं हे नवीन फीचर फारच उपयुक्त ठरू शकतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात