मुंबई, 2 ऑगस्ट : देशातील नागरिकांना यावर्षी ऑक्टोबरपासून 5G सेवांचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. अनेक महिन्यांपासून लोक 5G सेवेची वाट पाहत आहे. स्पेक्ट्रम लिलाव सोमवारी संपल्यानंतर सरकारला आशा आहे की पुढील प्रक्रिया वेगाने झाल्यास 5G सेवा यावर्षी ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी सुरु होईल. 1 ऑगस्ट रोजी संपलेल्या टेलिकॉम स्पेक्ट्रमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लिलावात 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली आल्या आहेत. यामध्ये रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली आहे. जिओने स्पष्टपणे सांगितले की ते शक्य तितक्या लवकर 5G सेवा सुरू करण्यास तयार आहे. टीव्ही9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सावधान! चुकूनही घेऊ नका ‘या’ नंबरवरील WhatsApp Call, अन्यथा… 5G सेवा कधी सुरू होईल माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, येत्या काही दिवसांत लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल. 10 ऑगस्टपर्यंत स्पेक्ट्रमची मान्यता आणि वाटप संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. अशा परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासोबतच भारतातील स्वस्त सेवेचा ट्रेंड यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की भारताच्या दूरसंचार उद्योगात पुढील दोन वर्षांत दोन-तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे आणि सरकारने उचललेल्या पावलांमुळे या क्षेत्रातील अनिश्चितता आणि जोखीम दूर झाली आहे. संभाव्य गुंतवणूक 4G आणि 5G पिढीतील टेलिकॉम सेवांमध्ये असेल. यामुळे वॉईस क्वॉलिटी चांगली होईल आणि हायस्पीड इंटरनेट डेटाही दिला जाईल. चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय कराल? पैसे परत मिळवण्याची प्रोसेस समजून घ्या पहिल्या टप्प्यात 5G सेवा कुठे उपलब्ध होईल? मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या टप्प्यात देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाऊ शकते. यामध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ यांचा समावेश आहे. दुसरीकडे, बोली लावण्यात आघाडीवर असलेल्या रिलायन्स जिओने सांगितले की, ते कमीत कमी वेळेत सेवा सुरू करण्यास तयार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







