मराठी बातम्या /बातम्या /मनी /

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय कराल? पैसे परत मिळवण्याची प्रोसेस समजून घ्या

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय कराल? पैसे परत मिळवण्याची प्रोसेस समजून घ्या

 जर एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर एखादा नंबर जरी चुकला तरी पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. अशावेळी काय करावं याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे.

जर एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर एखादा नंबर जरी चुकला तरी पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. अशावेळी काय करावं याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे.

जर एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर एखादा नंबर जरी चुकला तरी पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. अशावेळी काय करावं याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : डिजिटल बँकिंगमुळे नागरिकांचा बँकेत जाऊन रांगेत उभं राहण्याच्या ताण कमी झाली आहे. मात्र ऑनलाईन बँकिंगमध्ये अत्यंत काळजीचे सर्व व्यवहार करावे लागतात. जर एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर एखादा नंबर जरी चुकला तरी पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. अशावेळी काय करावं याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. बँकेला सर्व माहिती द्या जर चुकून तुम्ही दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर सर्वप्रथम तुमच्या बँकेला त्याबद्दल सांगावे लागेल. तुम्ही हे फोन, ईमेलद्वारे करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन ब्रान्च मॅनेजरला सर्व तपशील देऊ शकता. ज्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत तेच ही समस्या सोडवू शकतात. व्यवहाराबाबत सविस्तरपणे झालेल्या चुकीबद्दल तुमच्या बँकेला कळवा. यामध्ये व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि चुकून पैसे ट्रान्सफर करण्यात आलेला खाते क्रमांक इत्यादींचा समावेश आहे. पैसे चुकून चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले हे सिद्ध करावे लागेल. यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट देखील सादर करू शकता. राकेश झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात 300 कोटींची घट, 'या' शेअरमुळे मोठं नुकसान जर बँक खाते असेल तर लवकरच समस्या दूर होईल खाते क्रमांक असेल तर तुम्हाला तक्रार नोंदवावी लागेल आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. सेंडर आणि रिसिव्हर यांची खाती एकाच बँकेत असतील तर ही प्रक्रिया लवकर पूर्ण होते पण रिसिव्हरचे खाते दुसऱ्या बँकेत असल्यास वेळ लागतो. दुसर्‍या बँकेत खाते असेल तर अडचण वाढते रिसिव्हचे खाते दुसऱ्या बँकेत असल्यास, त्या बँकेच्या शाखेत जाऊन तक्रार दाखल करावी लागेल. बँक आपल्या ग्राहकाच्या परवानगीशिवाय कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. तसेच बँका आपल्या ग्राहकांची माहिती देत ​​नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्या बँकेला संपूर्ण परिस्थितीची माहिती द्यावी लागेल. एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर बँक खातेदाराशी संपर्क साधावा बँक त्या खात्याच्या मालकाला कळवेल आणि पैसे परत तुमच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगेल. त्यामुळे तुम्हाला त्या बँकेला संपूर्ण परिस्थितीची माहिती द्यावी लागेल. ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत ती समजूतदार आणि चांगली व्यक्ती असेल तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. पण जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या खाते क्रमांकामध्ये थोडीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना तपशील टाकता तेव्हा ते पुन्हा पुन्हा तपासा. मोठी रक्कम ट्रान्सफर करण्याआधी एक छोटी रक्कम ट्रान्सफर करुन ती योग्य रिसिव्हरच्या खात्यात जात आहे का ते तपासावे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank services, Money, Online payments

    पुढील बातम्या