Home /News /crime /

सावधान! चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील WhatsApp Call, अन्यथा...

सावधान! चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील WhatsApp Call, अन्यथा...

व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) लोकप्रियतेचा फायदा घेऊन सध्या स्कॅमर्स युजर्सना टार्गेट करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर नवा स्कॅम सुरू आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात सर्वांत जास्त वापरलं जाणारं मेसेंजिंग अ‍ॅप (Messaging App) आहे. अगदी गावखेड्यातील सामान्य माणसांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वच जण हे अ‍ॅप वापरतात. एखाद्याची विचारपूस करण्यापासून ते आमंत्रण आणि हल्ली तर ऑफिसची कामंही (Office Work) WhatsAppवरूनच होतात. आता हे अ‍ॅप इतकं लोकप्रिय आहे, त्यामुळे अनेक जण त्याचा वापर करून फ्रॉडदेखील (Fraud) करतात. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. 'आज तक'नं या संदर्भात वृत्त दिलंय. काय आहे धोका? व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सध्या स्कॅमर्स युजर्सना टार्गेट करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर नवा स्कॅम सुरू आहे. अनेकांना +92 कोड असलेल्या मोबाईल नंबरवरून WhatsApp वर कॉल येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरील या कॉल्सद्वारे, युजर्स लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचं सांगत त्यांची फसवणूक केली जाते. अनेक जण या भूलथापांना बळी पडतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. नंतर ते त्यांची वैयक्तिक माहिती (Personal Details) आणि स्कॅमर्सनी मागितलेली इतर माहिती त्यांच्याशी शेअर करतात, परिणामी नंतर त्यांचं खूप नुकसान होतं. कोणत्या देशाचा कोड? तुम्हाला माहीत नसेल पण +92 हा पाकिस्तानचा कंट्री कोड (Country Code) आहे. भारताचा कंट्री कोड +91 आहे. त्यामुळे हे फोन पाकिस्तानातून (Pakistan) येत असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, अनेक वेळा असे नंबर व्हर्चुअली उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी तुम्ही कोणत्याही देशात जाण्याची गरज नाही. तुम्ही आहात तिथूनच तुम्हाला ते अ‍ॅक्सेस करता येतात. त्यामुळे +92 या नंबरवरून येणारे सर्व कॉल पाकिस्तानमधून येतात असं नाही. Electric Vehicles: आता पेट्रोल-डिझेल कारच्या किमतीत घेता येईल इलेक्ट्रिक कार, सरकारचा मोठा निर्णय फोन आल्यास काय कराल? जर तुम्हाला +92 या कंट्री कोड नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल येत असतील, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. या नंबरवरून कॉल येत असेल आणि तुम्हाला तो नंबर माहीत नसेल, तर अशा कॉलकडे दुर्लक्ष करा. कॉल रिसिव्ह करू नका. तसंच त्या नंबरवर रिप्लाय करून जास्तीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याचदा युजर्सना फसवण्यासाठी स्कॅमर्स चांगला डीपी लावतात. त्यामुळेही युजर्स अशा फसवणुकीला बळी पडतात. पण तुम्ही मात्र कंट्री कोड कायम लक्षात ठेवा आणि त्यावरून येणाऱ्या मेसेज किंवा कॉलला रिप्लाय करू नका. तुम्हाला जर वारंवार अशा नंबरवरून कॉल येत असतील तर तुम्ही तो नंबर ब्लॉक करू शकता. तसंच तुम्ही अशा नंबरची तक्रारदेखील करू शकता. यासाठी कंपनीची सोय उपलब्ध आहे. तुम्ही सायबर फ्रॉडचे बळी ठरला असाल तर उशीर न करता पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार करा. मुलीला वाचवण्यासाठी बाबा बनले Superhero, Video मध्ये पाहा कसा वाचवला जीव यापुढे +91 हा कंट्री कोड वगळता अनोळखी नंबरवरून फोन आल्यास तो रिसिव्ह करू नका, तसंच मेसेज आल्यासही रिप्लाय करू नका. नाहीतर तुम्ही सायबर फ्रॉडचे बळी ठरू शकता.
    First published:

    Tags: Online crime, Whatsapp, Whatsapp alert

    पुढील बातम्या