मुंबई, 27 सप्टेंबर- बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या विवादात सापडली आहे. तिचा नुकताच रिलीज झालेला ‘ओ सजना’ हा म्युझिक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. हे गाणं लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठक यांच्या ‘मैने पायल है छनकाई’ यावरुन रिक्रिएट करण्यात आलं आहे. हे गाणं नेहाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्यावर सगळेच थिरकत आहेत. मात्र नेटकऱ्यांनी नेहाला चांगलंच धारेवर धरलं आहे. लोकांनी नेहा आणि तिच्या टीमवर प्रसिद्ध गाणं खराब केल्याचा आरोप केला आहे. फाल्गुनीनेही या रिमेकवर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नेहावर टीकाही केली आहे.त्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून येत आहेत. यामध्ये काही लोक फाल्गुनी पाठक यांना समर्थन देत आहेत. तर काही नेहाचं कौतुक करत आहेत. या प्रकरणात आता भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध डान्सर, सोशल मीडिया इन्फल्युन्सर धनश्री वर्माने उडी घेतली आहे. खरं तर, ‘ओ सजना’ या नेहा कक्करच्या नव्या गाण्यात धनश्री मुख्य कलाकाराच्या रुपात झळकली आहे. नुकतंच धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा यांनीही या गाण्याचं कौतुक केलं आहे. दोघांनीही पुढे येत म्हटलंय की नेहाने हे गाणं मूळ ट्रॅकपेक्षाही चांगलं बनवलं आहे. धनश्रीने नुकतंच मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ती फाल्गुनी पाठक यांचं ‘मैने पायल है छनकाई’ हे गाणं ऐकत मोठी झालीय आणि ते गाणं तिला खूप आवडतं. या गाण्याचा रिमेक झाल्याने हे गाणं अधिक पसंत केलं जाईल याची खात्री असल्याचं तिने सांगितलं आहे. याबाबत पुढे बोलताना धनश्री वर्मा म्हणाली, “जेव्हा आम्हाला हे असं होणार आहे हे कळालं, तेव्हा आम्ही खूप उत्साहित झालो. आम्हाला माहित आहे की हे गाणं लोकांना खूप आवडतं आणि जर ते पुन्हा नव्याने तयार केलं गेलं तर ते आणखी आवडेल. त्यामुळे हे गाणं बनवण्यात आलं आहे. संगीतकार - नेहा कक्कर, तनिष्क बागची आणि जानी यांनी ते आणखी सुंदर बनवलं आहे. या टीमने खरोखरच या गाण्याला पूर्णपणे न्याय दिला आहे. त्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत. असं धनश्रीचं म्हणणं आहे.
प्रियांक शर्माने सांगितलं की, त्याने एका मिनिटाच्या आत या गाण्यासाठी होकार दिला होता. त्याने पुढे सांगितलं, “हे एक आयकॉनिक गाणं आहे. गाण्याची अफाट लोकप्रियता आहे. (हे वाचा: नेहा कक्करवर भडकले युजर्स;केली चक्क 8 वर्षे तुरुंगवासाची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण? ) आणि त्यांच्या टीमने खूप छान रिमेक बनवला आहे. त्यांनी मूळ गाण्याला अजून चांगलं बनवल्याचं त्यांचं मत आहे. हे सर्व कसं होणार हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. तसेच, टीम इतकी सुंदर होती की आम्हाला खूप मजा आली. असं अभिनेता प्रियांकाने म्हटलं आहे.