मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नेहा कक्करवर भडकले युजर्स;केली चक्क 8 वर्षे तुरुंगवासाची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

नेहा कक्करवर भडकले युजर्स;केली चक्क 8 वर्षे तुरुंगवासाची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

नेहा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया सतत चर्चेचा विषय बनलेली असते. दरम्यान आता मात्र नेहा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

नेहा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया सतत चर्चेचा विषय बनलेली असते. दरम्यान आता मात्र नेहा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

नेहा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया सतत चर्चेचा विषय बनलेली असते. दरम्यान आता मात्र नेहा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 23 सप्टेंबर-  गायिका नेहा कक्कर फारच कमी वेळेत अफाट लोकप्रिय झाली आहे. नेहाने आपल्या आवाजाची जादू पसरवत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. आज नेहा कक्कर तरुणाईंच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. नेहा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया सतत चर्चेचा विषय बनलेली असते. दरम्यान आता मात्र नेहा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या चाहते नेहावर प्रचंड भडकलेले दिसून येत आहेत. पाहूया नेमकं काय घडलंय.

नेहा कक्कर चाहत्यांना नेहमीच आपल्या आवाजाने भुरळ पाडत असते. तिच्या प्रत्येक गाण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून असते. तिच्या प्रत्येक म्युझिक अल्बमला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम आणि कौतुक मिळत असतं. परंतु यावेळी मात्र नेमकं उलट झालं आहे. नेहा आपल्या एका गाण्यामुळे अडचणीत आली आहे. नेहा कक्करला आपल्या नव्या गाण्यामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेहाला सोशल मीडियावर अनेक नकारात्मक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. दरम्यान एका युजरने तर रोष व्यक्त करत चक्क नेहा कक्करला या गाण्यासाठी 8 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

90 च्या दशकातील 'मैने पायल है छनकाई' हे गाणं लोकांना आजही आवडतं. लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठक यांनी हे आपल्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. याचा गाण्याचा रिमेक आला आहे. हे रिमेक गाणं नेहा कक्करने गायलं आहे. हे गाणं 19 सप्टेंबर रोजी रिलीजसुद्धा झालं आहे. हे गाणं रिलीज होताच अनेक चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी नेहा कक्करला या गाण्यांचा रिमेक करुन गाणं खराब केल्याबद्दल फटकारलं आहे. हे गाणं पाहून चाहते नेहावर नाराज झाले आहेत. यासोबतच एका चांगल्या गाण्याला खराब केल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे.

(हे वाचा:विजय देवरकोंडाने Liger फ्लॉपनंतर परत केले नाहीत 7 कोटी,फोनही बंद? ट्विटमधून मोठा दावा )

हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नकारात्मक कमेंट्स समोर येत आहेत. ज्यांनी हे गाणं पाहिलं आहे ते सडकून टीका करत आहेत. तर सोशल मीडियावर होत असलेल्या या टीका पाहून या गाण्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने कमेंट करत लिहलंय, 'मी गाण्याचे रिमेक बनवण्याच्या विरोधात नाही, परंतु या गाण्यात नेहा कक्करच्या आवाजाने कानाचे पडदेच फाडले आहेत. तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहलंय, 'नेहा कक्करला 8 वर्षांचा तुरुंगवास व्हायला हवा, आमच्या बालपणापासूनची सुंदर आठवण असलेल्या गाण्यांपैकी एक असलेलं हे गाणं नेहाने खराब केलं आहे'.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Neha kakkar