बंगळुरू, 16 जानेवारी : स्वच्छ भारतच्या नावाखाली देशात विविध योजना राबवल्या जात आहेत. असे असले तरी उघड्यावर शौच करणे कमी झालेले नाही. दरम्यान या सगळ्या परिस्थितीला कंटाळून आता चक्का देशातल्या एक महानगरपालिकेनं एक आगळावेगळा उपाय शोधला आहे. हा उपाय वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का तर बसेलच, पण उघड्यावर शौच करतान लोक शंभरदा विचार करतील.
ग्रेटर बंगळुरू महानगरपालिकेने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात उपाय म्हणून एक अनोखी कल्पना आखली आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पालिकेने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भिंतींवर आरसे बसवले आहेत, ज्यामुळे रस्त्यावर शौचास जाणाऱ्यांना लाज वाटेल. इंदिरानगरच्या ईएसआय रुग्णालयाच्या कंपाऊंडच्या एका भिंतीवर 8X4चा आरसा बसवण्यात आला आहे. शहरातील ज्या ठिकाणी सर्वात जास्त दुर्गंधी पसरवली जात आहे अशाच ठिकाणी हे आरसे बसवण्यात आले आहेत. शहरातील इतर ठिकाणी अशा प्रकारचे ग्लास बसविण्याची महापालिकेची योजना आहे.
वाचा-साताऱ्यात गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांच्या नावाच्या पाट्या
BENGALURU, LOOK BEFORE YOU PEE: PUBLIC SHAMING TO PREVENT PUBLIC URINATION#Kudos to #BBMP#Bengaluru #swacchbengaluru @BBMP_MAYOR @hd_kumaraswamy @BJPKarITCell @BSYBJP @Office_of_BSY pic.twitter.com/o71JfdB6ig
— ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ (@im_vinodhraj11) January 14, 2020
वाचा-तुमच्या खिशातून आता जास्त कर जाणार? कर रचनेत होऊ शकतात मोठे बदल
एवढेच नव्हे तर या आरशांवर एक क्यूआर कोडही ठेवला गेला आहे ज्यास जवळच्या शौचालयाबद्दल जाणून घेण्यासाठी स्कॅन केले जाईल. या कल्पनेबाबत महानगरपालिकेचे आयुक्त बी.एच. अनिल कुमार यांनी, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना जाहीरपणे लाज वाटली पाहिजे. या उद्देशाने भिंतींवर काचा लगावण्यात आल्या आहेत.
वाचा-तुमच्या खाण्यापासून ते पिण्यापर्यंत सरकारला हवी उत्तरं! खोट बोलल्यास आकरणार दंड
तर, दुसर्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उघड्यावर शौच करण्यासारख्या गोष्टींमुळे शहराची प्रतिमा खराब होते. या सर्व गोष्टींमुळे लोकांना फुटपाथवर चालणे अवघड होते आणि लोकांना रस्त्यावर चालण्यास भाग पाडले जाते. लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, दंड लावण्याचा नियमही बनविला पण त्यात काही फरक पडला नाही. महानगरपालिकेच्या प्रत्येक काचेची किंमत सुमारे 2 लाख रुपये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.