मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Yuzvendra Chahal: अखेर घटस्फोटाच्या चर्चांवर युजवेंद्र चहलनं सोडलं मौन, म्हणाला...

Yuzvendra Chahal: अखेर घटस्फोटाच्या चर्चांवर युजवेंद्र चहलनं सोडलं मौन, म्हणाला...

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

Yuzvendra Chahal: गेले दोन दिवस सोशल मीडियात टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बिनसलं असल्याच्या बातम्या आल्या. इतकच नव्हे तर दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याचंही बोललं गेलं. पण या सगळ्यावर चहलनं पडदा टाकला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 18 ऑगस्ट: युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियात चांगलाच जोर धरला होता. अनेक माध्यमांमध्येही या दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याच्या बातम्या चघळल्या जात होत्या. पण आता या सगळ्यावर खुद्द युजवेंद्र चहलनं पडदा टाकला आहे. चहलनं नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्यानं सोशल मीडियातल्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. चहलनं म्हटलंय, “तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या नात्यातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. हे सगळं थांबवा.’’ काय आहे प्रकरण? चहल आणि धनश्रीमध्ये काहीतरी बिनसलंय अशा बातम्या सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या. आणि त्यामागचं कारण आहे धनश्री वर्मानं इन्स्टाग्रामवरुन हटवलेलं चहल हे आडनाव. धनश्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधी धनश्री वर्मा-चहल असं लिहिलेलं होतं. पण तिनं चहल हे नाव हटवलं आणि चर्चा सुरु झाली ती त्यांच्या नात्यातल्या दुराव्याची. हेही वाचा - BCCI Umpires Exam: हेल्मेटमध्ये बॉल अडकल्यास बॅट्समन कॅच आऊट होईल? बीसीसीआयची अंपायर्सना गुगली चहलची संभ्रमात टाकणारी स्टोरी धनश्री वर्मानं इन्स्टावरुन आडनाव हटवलं आणि त्यानंतरच्या सगळ्या चर्चांना हवा दिली ती युजवेंद्र चहलच्या एका इन्स्टा स्टोरीनं. या स्टोरीमध्ये चहलनं एक फोटो शेअर केला. त्यात लिहिलं होतं ‘New life loading…’ याच पोस्टमुळे दोघांच्या नातेसंबंधात काहीतरी बिनसलं असल्याच्या शक्यतेला बळ मिळालं. त्यात भर टाकली ती धनश्रीच्या नव्या पोस्टनं. तिनं स्वत:चाच एक फोटो पोस्ट करत ‘एक राजकुमारी तिचं दु:ख हेच तिची ताकद बनवेल’ असं म्हटलंय. एकूणच सोशल मीडियातल्या दोघांच्या परस्पर विरोधी पोस्टमुळे धनश्री आणि चहलमध्ये सगळं आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं. एएनआयच्या अकाऊंटवरुन ट्विट दरम्यान चहल आणि धनश्री वर्मानं पंजाब कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय असं ट्विट एएनआयच्या अकाऊंटवरुन पडलं. त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. आणि या चर्चांना जणू ऊत आला. पण एनएनआयनं आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट करत फेक अकाऊंटवरुन कुणीतरी ते ट्विट केलं असल्याची माहिती दिली. आणि दोघांच्या घटस्फोटाविषयी अशी कोणतीही बातमी नसल्याचं स्पष्ट केलं.
First published:

Tags: Sports, Yuzvendra Chahal

पुढील बातम्या