चंदीगड, 2 एप्रिल : भारताने 2011 साली वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकल्याच्या घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं चॅम्पियन टीममधील खेळाडू त्यांच्या आठवणी सांगत आहेत. भारताच्या विजयात युवराज सिंह (Yuvraj Singh) याचे योगदान मोलाचे होते. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवराजला 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारानं गौरवण्यात आले होते.
वर्ल्ड कप विजेतेपदाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं युवराजनं एक खास व्हिडीओ शेअर (Video) केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने संपूर्ण स्पर्धेतील आठवणी सांगितल्या आहेत. युवराजनं विजेतेपदामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सर्व खेळाडूंचा उल्लेख केला आहे. सचिन तेंडुलकरचा फॉर्म, गंभीरचे फायनलमधील 97 रन, धोनी 91 रनची खेळी याची आठवण युवराजनं सांगितली आहे. झहीर खानचा फॉर्म हा निर्णायक घटक ठरल्याचं त्यानं सांगितलं. त्याचबरोबर मी देखील स्पर्धेत ठीक योगदान दिलं, असं युवराज म्हणाला.
'वर्ल्ड कप विजेतेपद ही आमच्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे. माझ्या क्रिकेट करियरमधील ती सर्वोच्च घटना होती. आम्ही आमच्याच मैदानात वर्ल्ड कप जिंकला. ही कामगिरी करणारा भारत पहिला देश होता', असेही युवराजने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
April 2, 2011 - a day when history was created! We wanted to win the WC for India & for the master @sachin_rt who carried the nation’s expectations over decades!
Indebted to be able to represent India & bring glory to our nation 🙏🏻 🇮🇳 #AlwaysBleedBlue #WC2011 @ICC @BCCI pic.twitter.com/kCR7pTL6Bx
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 2, 2021
सचिनला दिल्या शुभेच्छा
युवराज सिंहनं यावेळी सध्या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहकाऱ्यांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या. सचिनसह सध्या कोरोनाग्रस्त असलेलं सर्व खेळाडू लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यानं केली.
सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सचिननं स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
( वाचा : 'फक्त एका सिक्समुळे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो नाही', गंभीरचं मोठं वक्तव्य )
'तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. लवकरच बरा होऊन मी घरी परतेल, अशी आशा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. सर्व भारतीय आणि माझ्या टीममधील सहकाऱ्यांना वर्ल्ड कप विजेतेपदाच्या दशकपूर्तीच्या शुभेच्छा ' असं ट्वीट सचिननं केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sachin tendulkar, Yuvraj singh