मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ICC World Cup 2011 : 'फक्त एका सिक्समुळे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो नाही', गंभीरचं मोठं वक्तव्य

ICC World Cup 2011 : 'फक्त एका सिक्समुळे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो नाही', गंभीरचं मोठं वक्तव्य

वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये (ICC World Cup 2011)  प्रत्येक खेळाडूचे योगदान होते. फक्त एका सिक्समुळे विजेतेपद मिळालेलं नाही,' असं गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) स्पष्ट केलं आहे.

वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये (ICC World Cup 2011) प्रत्येक खेळाडूचे योगदान होते. फक्त एका सिक्समुळे विजेतेपद मिळालेलं नाही,' असं गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) स्पष्ट केलं आहे.

वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये (ICC World Cup 2011) प्रत्येक खेळाडूचे योगदान होते. फक्त एका सिक्समुळे विजेतेपद मिळालेलं नाही,' असं गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली, 2 एप्रिल : दहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतानं वर्ल्ड कप जिंकून (ICC World Cup 2011) इतिहास घडवला होता. 1983 नंतर तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं ही कामगिरी केली होती. वर्ल्ड कप फायनलमधील भारताच्या विजयात गौतम गंभीरचं (Gautam Gambhir)  मोठं योगदान होतं. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर आऊट झाल्यानं भारतीय टीम संकटात सापडली होती. त्यावेळी गंभीरनं जबाबदारी खेळ करत टीमला विजयाचा मार्ग दाखविला. त्याचं शतक मात्र फक्त 3 रननं हुकलं. तो 97 रन काढून आऊट झाला होता.

वर्ल्ड कप विजेतेपदाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गंभीरनं 'टाईम्स ऑफ इंडिया' ला मुलाखत दिली आहे. वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये प्रत्येक खेळाडूचे योगदान होते. कोणत्याही एकामुळे विजय मिळालेला नाही,' असं गंभीरनं स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाला गंभीर?

'एका खेळाडूच्या कामगिरीच्या जोरावर आपण वर्ल्ड कप जिंकला असं तुम्हाला वाटतं का? तसं असतं तर टीम इंडियानं आजवर झालेले सर्व वर्ल्ड कप जिंकले असते. आपल्या देशात आपण काही जणांची पूजा करतो हे चूक आहे. माझा यावर विश्वास नाही. कोणत्याही टीममध्ये व्यक्तीला जागा नसते.

तुम्ही झहीर खानला विसरला का? त्याने पहिल्या स्पेलमध्ये सलग तीन ओव्हर मेडन टाकल्या होत्या. युवराज सिंहचा क्वार्टर फायमलमधील खेळ तुम्ही विसरला का? इतकंच नाही तर सचिनचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं शतक कुणी कसं विसरु शकतं? आपण फक्त एकाच सिक्सची आठवण का काढतो? एका सिक्समुळे वर्ल्ड कप जिंकत असू तर युवराजनं आपल्याला किमान 6 वर्ल्ड कप जिंकून दिले असते, असं मला वाटतं. त्यानं 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध सलग 6 सिक्स लगावले होते. युवराजबद्दल कुणी बोलत नाही. तो 2011 च्या वर्ल्ड कपचा 'मॅन ऑफ द सीरिज' होता. आपण फक्त एकाच सिक्सबाबत सतत बोलत असतो.' या शब्दात गंभीरनं त्याची नाराजी व्यक्त केली आहे.

( वाचा : ICC World Cup 2011 : युवराजनं धोनीला वाचवलं आणि सचिन मसाज टेबलवरुन उठला नाही! )

गौतम गंभीरनं या विषयावर PTI ला  दिलेल्या मुलाखतीमध्ये आता पुढं जाण्याची वेळ आली आहे असं म्हटंलं होतं. 'ही कालची गोष्ट आहे, असं अजिबात वाटत नाही. याला आता 10 वर्ष झाली आहेत. मी अशी व्यक्ती नाही जो जास्त मागे वळून बघेल. नक्कीच हा गौरवपूर्ण क्षण होता, पण आता भारतीय क्रिकेटने पुढे जायला हवं. आता पुढचा वर्ल्ड कप जिंकण्याची वेळ आली आहे,' असं गंभीर म्हणाला.

First published:

Tags: Cricket, Gautam gambhir, MS Dhoni