IPLबाबात सर्वात मोठी बातमी, एप्रिल नाही तर 'या' महिन्यांत होणार स्पर्धा

IPLबाबात सर्वात मोठी बातमी, एप्रिल नाही तर 'या' महिन्यांत होणार स्पर्धा

बीसीसीआय यावर्षीच आयपीएलचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यासाठी संघांचे वेळापत्रक पाहिले जात आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल कोरोनामुळे रद्द होण्याच्या मार्गावर असताना चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याआधी ही स्पर्धा 29 मार्चला होणार होती, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र आता एप्रिलमध्ये ही स्पर्धा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टोकियो ऑलिम्पिकला एक वर्षासाठी पुढे ढकलल्यानंतर आयपीएल रद्द होण्याची शक्यता वाढली. मात्र बीसीसीआय यावर्षीच आयपीएलचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलचा तेरावा हंगाम हा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान खेळवला जाऊ शकतो. यादरम्यान तारखा शोधण्याचे सध्या बीसीसीआय करत आहे. त्यामुळे ही स्पर्धा ऑगस्टच्या शेवटी ते ऑक्टोबरच्या सुरूवातीस आयोजित करता येईल, हा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवला आहे. मात्र यासाठी पुढील चार महिन्यांत भारतातून कोरोना विषाणूचे पूर्णपणे उच्चाटन करणे आवश्यक असेल.

वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित

बीसीसीआयचे प्लॅनिंग सुरू

भविष्यात गोष्टी कोणत्या दिशेने जातात याकडे बीसीसीआयचे लक्ष आहे. त्यानुसार पुढील योजना तयार केल्या जातील. आयपीएल आयोजक संघ सर्व शक्यतांचा विचार करत आहे. या पर्यायांमध्ये परदेशी खेळाडूविनाही स्पर्धा आयोजित करण्याचीही तयारी आहे. आयपीएल हा बीसीसीआयचा महसूल मिळवण्याचा एक मोठा मार्ग आहे, त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाल्यास त्याचा सगळ्यात जास्त फटका बीसीसीआयला बसेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीत. आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेऊ. आम्ही ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान तारखा बघत आहोत, असे सांगितले.

वाचा-IPL 2020 होणार रद्द, पुढच्या वर्षी होणार नाही दिग्गज खेळाडूंचा लिलाव-रिपोर्ट

ऑगस्ट-ऑक्टोबर दरम्यान महत्त्वाच्या स्पर्धा

सध्याच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका आहे. यानंतर ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय संघाचा तीन एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वे दौर्‍याचे वेळापत्रकदेखील नियोजित आहे. इतर संघांबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडचा संघ पाकिस्ताविरुद्ध मालिका खेळणार आहे. हा दौरा 2 सप्टेंबर रोजी संपेल. यानंतर आयर्लंडचा संघ इंग्लंडमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत खेळेल. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा ऑगस्टमध्ये मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ या दोन महिन्यांत कोणतीही मालिका खेळणार नाही.

वाचा-टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर, जपानला बसणार मोठा फटका!

आशियाई कपच्या वेळापत्रकात होणार बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आशिया चषक परिषदेचे आशिया चषक वेळापत्रक बदलण्यासाठी पटवून देऊ शकते. तरी, आयपीएलसाठी बीसीसीआयकडे 37 दिवसांचा कालावधी असेल. या काळात त्यांना सर्व सामने खेळवावे लागतील. तसेच, पावसाळ्यामुळे काही सामन्यांना फटकाही बसू शकतो.

First published: March 31, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading