मुंबई, 10 जून : 2011चा विश्वचषक…वानखेडेवर धोनीनं खेचलेला तो षटकार कोट्यावधी भारतीयांच्या मनामनात बसला आहे. मात्र, या वर्ल्ड कपचा खरा नायक होता, युवराज सिंग. यजमान संघावर पहिल्या सामन्यापासून अपेक्षांचे ओझे होते आणि सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप असेल या भीतीनं संपर्ण भारतीय संघ चिंतेत होता. 2007च्या वर्ल्ड कपमध्ये लीग स्टेजमध्येच बाहेर गेलेल्या भारतावर घरच्या मैदानांवर खेळण्याचे दडपण होते. पण या सगळ्यात युवराज सिंग वेगळ्याच मनस्थितीत होता. 1983मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा वर्ल्ड कपला गवसणी घातली होती. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. पण या स्पर्धेत युवराज सिंगनं 8 सामन्यात 90.50च्या सरासरीनं 362 धावा केल्या होत्या. हार्ड हिटर युवराज सिंग नसता तर, सचिन तेंडुलकरचे स्वप्न अपुर्ण राहिलं असतं. मॅन ऑफ द टुर्नामेंट अवार्ड मिळालेला युवराज सिंगनं गोलंदाजीमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. 9 सामन्यात तब्बल 15 विकेट त्यानं घेतल्या होत्या. पण या सगळ्यात त्याच्या आयुष्यात असं काही सुरु होतं, की त्याचा अंदाज कोणालाच नव्हता. एकीकडे फलंदाजी आणि गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरत होता. तर दुसरीकडे त्यालाच रक्ताच्या उलट्या होत होत्या. कारण त्याला रक्ताचा कर्करोग झाला होता. ICC टुर्नामेंट गाजवणारा खेळाडू युवराज सिंग हा आयसीसी टुर्नामेंट गाजवणारा एकमेव खेळाडू आहे. 2002च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनं शानदार खेळी केली होती. त्यानंतर त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळाले. त्यानंतर 2007च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं असा इतिहास केला, जो करणे कोणालाही जमले नव्हते. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार लगावणारा तो पहिला फलंदाज होता. त्यानंतर त्यानं सेमीफायलमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात युवराजची 30 चेंडूत 70 धावांची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. काय आहे युवराजचा रेकॉर्ड युवराजनं 40 कसोटी सामन्यात 33.92च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या फिल्डिंगची चर्चा जास्त रंगली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 304 सामन्यात 36.55च्या सरासरीनं युवराजनं 8701 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपचा एकचं किंग वर्ल्ड कप करिअरमध्ये युवराज सिंगनं आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. यात त्यानं 52.71च्या सरासरीनं 738 धावा केल्या आहेत. त्याच्या रेकॉर्ड वर्ल्ड कपमधला सर्वोत्कष्ठ आहे. 2017मध्ये खेळला आहे शेवटचा सामना वर्ल्ड कप गाजवणारा युवराज सिंग कॅन्सरमुळं काही काळ विश्रांती घेतली होती. पण 2017नंतर त्यानं एकदिवसीय सामना खेळलेला नाही. आता निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग आयसीसीच्या विदेशी टी-20 लीगमध्ये करिअर करण्याच्या विचारात आहे. वाचा-World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या ‘या’ कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी वाचा- Point Table : विराटसेनेची विजयी घौडदौड, पण गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर ‘हा’ संघ वाचा-20 साल बाद… ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







