20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी

20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी

20 वर्षांपूर्वी भारताचे सलामीवीर सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर हे दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नव्हते मात्र, एका खेळाडूने शतक केलं होतं.

  • Share this:

ओव्हल, 06 जून : वर्ल्ड कपच्या इतिहासात 20 वर्षांनी पुन्हा ओव्हलवर भारताकडून शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केलं. शिखर धवनने या सामन्यात 117 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे आव्हान उभा केलं. शिखर धवनच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 17 वे शतक आहे. या शतकासह त्याने ओव्हलवर इतिहासाची पुनरावृत्ती केली.

शिखर धवनच्या आधी भारताकडून फक्त एकाच फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये शतक केलं होतं. असी कामगिरी मधल्या फळीतील फलंदाज अजय जडेजाने 20 वर्षांपूर्वी 1999 मध्ये केली होती. विशेष म्हणजे ओव्हलवरच जडेजाने शतकी खेळी केली होती. त्याने 100 धावा केल्यानंतरही भारताला पराभव पत्करावा लागला होता.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मार्क वॉच्या 83 धावांच्या जोरावर 282 धावांचं आव्हान भारताला दिलं होतं. आता 350 धावा कमी वाटत असल्या तरी 20 वर्षांपूर्वी ते मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. यंदा ओव्हलवर समालोचन करणारा सौरव गांगुली 8 धावांवर आणि सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाले होते. तेव्हा भारताकडून जडेजाने 138 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय रॉबिन सिंगने 75 धावा केल्या होत्या. हे दोघे वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. यामुळे भारतीय संघ 48.2 षटकांत 205 धावांपर्यंत मजल मारू शकला.

20 वर्षांनी पुन्हा त्याच मैदानावर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केलं. धवनने हे शतक फक्त 95 चेंडूत पूर्ण केलं. 109 चेंडूंचा सामना करताना 14 चौकारांच्या सहाय्याने शिखर धवनने 117 धावा केल्या.

वाचा- बेल्स बुमराहवर रुसल्या, वर्ल्ड कपच्या इतिहासात घडताहेत धक्कादायक घटना

वाचा-भारताच्या नावावर नवा विक्रम, ऑस्ट्रेलियासह सर्वच देशांना टाकलं मागे

वाचा- गब्बर-हिटमॅनच्या शतकी भागिदारीने मोडले दिग्गजांचे विक्रम

VIDEO : 'द ओव्हल'मध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचला विजय मल्ल्या

First published: June 9, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या