ओव्हल, 10 जून : दक्षिण आफ्रिकेनंतर, भारतानं कांगारुंची शिकार केली, त्यामुळं वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्या विजय घौडदौडीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत आपला दुसरा विजय मिळवला, याशिवाय भारतीय संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पहिल्या क्रमांकावर 6 गुणांनी न्यूझीलंडचा संघ आहे. त्यामुळं भारताला पुढील सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. भारतानं आतापर्यंक केवळ 2 सामने जिंकले आहे. यात त्यांना रनरेट +0.539 आहे. त्यामुं भारत आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारचानं प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला यात, रोहित शर्मा-शिखर धवन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर आणि शिखर धवनच्या 117 धावांच्या खेळीमुळं भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान 353 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून फिंच आणि वॉर्नर यांनी संयमी सुरुवात केली मात्र, बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि चहलच्या तिगडीनं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून तळाला आलेल्या अलेक्स कॅरे यानं 55 धावांची खेळी केली. त्याआघी स्टिव्ह स्मिथनं 69 धावांची खेळी केली होती. मात्र त्यांना या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. दरम्यान, 1999 नंतर पहिल्यांदाचा ऑस्ट्रेलियाचा आव्हानाचा पाठलाग करताना पराभव झाला आहे.
India climb up to 3rd place in the #CWC19 standings after a convincing victory over Australia. This is how the points table looks like after Match 14 👇#CricketWorldCup2019 pic.twitter.com/pCXiKcCPgK
— News18 CricketNext (@cricketnext) June 9, 2019
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबीन पध्दतीचा वापर होत असल्यानं प्रत्येक संघाचे सर्व प्रतिस्पर्धी संघाशी सामने होणार आहेत. यात पहिल्या चार क्रमांकावरचे संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. त्यामुळं भारतीय संघाला आपले सर्व चांगल्या रनरेटनं जिंकावे लागणार आहे. तसेच, इतर संघाच्या वाटचालीकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. दरम्यान, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना आता सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

)







