मुंबई, 23 फेब्रुवारी : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाशी असणार आहे. पाचवेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने हरमनप्रीतसाठी एक कँपेन सुरू केलं आहे. युवराज सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असं सर्च केल्यावर फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या असं दिसत असल्याचं म्हटलंय. युवराज सिंह म्हणाला की आपण हे कधी सुधारणार आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही यावर भाष्य केलं आहे. त्यानेही लोकांना या कँपेनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. हेही वाचा : कसोटी डेब्युआधी चक्रीवादळाने घर नेलं, LIVE पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला क्रिकेटर युवराज सिंगने म्हटलंय की, भारतीय महिला संघाच्या कर्णधाराचे नावही सर्च रिजल्टमध्ये दिसायला हवं. जर आपण हे तयार केलं आहे तर हे सुधारण्याची क्षमताही आपल्यात आहे. महिला क्रिकेटसाठी आपण असं करायला हवं.
If we’ve created this problem,
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 21, 2023
we also have the power to fix it.
Let’s do it for women’s cricket! 🏏💪🏻
Use this hashtag: #IndianCricketTeamCaptainHarmanpreetKaur
on #Twitter #Quora #LinkedIn and #Reddit
to spread the word and make a difference! 🇮🇳 pic.twitter.com/JMn5Cw7Cel
युवराज सिंहने जो व्हिडीओ शेअऱ केला आहे त्यात म्हटलंय की, भारतीयांनो थोडं इकडे लक्ष द्या. गुगलवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सर्च करा. फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे नाव, फोटो दिसतो. कर्णधार हरमनप्रीत कुठे आहे? असा प्रश्न युवराजने विचारलाय. हरमनप्रीत कौरने वयाच्या २० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २००९ मध्ये तिने पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला होता. २०१२ च्या महिला टी२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात तिने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा भारताची कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार झुलन गोस्वामी दुखापतीमुळे बाहेर होते. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कपही जिंकला होता.