मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Team India च्या अपयशाचे IPLशी काही देणं घेणं ; गौतम गंभीर भडकला

Team India च्या अपयशाचे IPLशी काही देणं घेणं ; गौतम गंभीर भडकला

भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला (IPL2021) जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. यावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाष्य केले आहे.

भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला (IPL2021) जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. यावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाष्य केले आहे.

भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला (IPL2021) जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. यावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाष्य केले आहे.

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची खराब कामगिरी पाहता भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला (IPL2021) जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांनी मत व्यक्त केले. इतकेच नव्हे तर BanIPL असा हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरु झाला होता. दरम्यान, टीम इंडियाच्या अपयशाचा दोष आयपीएलला देणाऱ्यांवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) संताप व्यक्त केला आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सनं तर न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सनं पराभव झाला आहे. सलग दोन पराभवामुळे सेमी फायनल गाठण्याची टीम इंडियाची आशा आता जर-तरमध्ये अडकली आहे. टीम इंडियाच्या या खराब कामगिरीला आयपीएल लीगला दोषी ठरवले.

मात्र, गंभीरने आयपीएल लीगचे समर्थन करत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'तुम्ही आयपीएलला दोषी ठरवू शकत नाहीत. भारतीय क्रिकेटमध्ये काही चुकीचं घडलं, तर प्रत्येक जण आयपीएलवर बोटं उचलतं. हे चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला मान्य करावं लागेल दोन-तीन टीम आपल्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळत आहेत. जितक्या लवकर आपण स्वीकार करू, तितकं चांगलं राहिल.' असे मत गंभीरने एका स्पोर्ट वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपण दडपणाखाली असल्याचं दिसलं. आपण सामन्यापूर्वीच आत्मविश्वास गमावला होता. याचा आयपीएलशी काही देणं घेणं नाही. २०१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतही असंच झालं होतं. त्या वेळेसही आयपीएलनंतर वर्ल्डकप खेळलो होतो. आयपीएल महत्त्वपूर्ण आहे कारण खेळाडूंना पर्याप्त सरावाची गरज असते. आपण २-३ सामन्यांचा अभ्यास करून वर्ल्डकप खेळू शकत नाही असेही यावेळी गंभीर म्हणाला.

दोन दिवसांपूर्वी, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी भारताच्या सुमार खेळीबद्दल आयपीएलला जबाबदार धरलं आहे.

भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाहीत आणि थकलेले दिसत आहेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

First published:

Tags: Gautam gambhir, IPL 2021, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india