कॉक्स बाजार-बांगलादेश, 30 नोव्हेंबर: सध्या भारताचा अ संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या पहिल्याच चार दिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला. मंगळवारी मॅचच्या पहिल्याच दिवशी भारतानं बांगलादेश अ संघाचा पहिला डाव 112 धावात गुंडाळला. त्यानंतर यशस्वी जैसवाल आणि अभिमन्यू ईश्वरनच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर भारतानं पहिल्याच दिवशी आघाडी घेतली होती. पण आज या दोघांनीही वैयक्तिक शतकं झळकावून भारतीय डावाला मजबूत स्थितीत नेलं. त्यात मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जैसवालचं शतक खास ठरलं.
पदार्पणातच यशस्वीचं शतक
यशस्वी जैसवालनं भारत अ संघाकडून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं. त्यानं पदार्पणाच्या या सामन्यात शतकी खेळी करण्याचा पराक्रम गाजवला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच यशस्वीनं 159 बॉलमध्ये शतक साजरं केलं.
'A' debut to remember for YBJ! 💯🇮🇳 pic.twitter.com/2QoWSNIy3N
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 30, 2022
यशस्वीचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं हे सहावं शतक ठरलं. त्यानं याच वर्षी दुलीप ट्रॉफीतही द्विशतकी खेळी केली होती. तर रणजी ट्रॉफीतही धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये एक चांगला ओपनर म्हणून भविष्यात यशस्वी जैसवाला भारतीय संघात संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी पण इतरांचं काय? तिसऱ्या वन डे टीम इंडियाची पाहा काय झाली अवस्था...
सौरभ कुमारचा भेदक मारा
दरम्यान काल डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनिच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा डाव पहिल्याच दिवशी 112 धावात आटोपला. सौरभ कुमारनं 4 तर सैनीनं 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय मुकेश कुमारनं 2 तर अतित सेठनं 1 विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india