जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTCच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला मोठा फायदा पण...

WTCच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला मोठा फायदा पण...

WTCच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला मोठा फायदा पण...

भारताच्या बांगलादेशविरुद्ध विजयामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा पाकिस्तानचा एक मार्ग बंद झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आणखी एक मालिका जिंकली आहे. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा पाकिस्तानचा एक मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, भारताला मोठा फायदा झाला असला तरी अद्याप भारताने फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. फायनल गाठण्यासाठी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत सध्या चार संघ आहेत. यात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचा समावेश आहे. तर पाकिस्तान फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पाचवा संघ आहे. पाकिस्तानच्या आधी इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ बाहेर पडले आहेत. तर बांगलादेशविरुद्ध विजयाचा भारताला विजयाच्या टक्केवारीत फायदा झाला. हेही वाचा :  IND vs BAN Test: अश्विन-अय्यर बनले संकटमोचक, टीम इंडियाचा विजय; मालिकेत क्लीन स्वीप

 भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाची टक्केवारी 58.93 टक्के इतकी आहे. सध्या भारतीय संघ यामध्ये दुसऱ्या स्थानावर असून पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 76.92 टक्के इतकी आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.55 टक्के इतकी आहे. तर श्रीलंकेचा संघ 53.33 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.

इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप झाल्याने पाकिस्तानची स्थिती जर तरच्या समीकरणावर अवलंबून होती. भारताचा बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात पराभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत क्लीन स्वीप झाल्यास त्यांना संधी होती. मात्र भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकल्यानं पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आता त्यांना टॉप 4 मध्ये स्थान मिळवता येऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात