मुंबई, 2 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. 18-22 जून या कालावधीमध्ये हा महामुकाबला रंगेल, पण या सामन्याआधी न्यूझीलंडच्या टीमसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. किवी टीमच्या मधल्या फळीचे शिलेदार केन विलियमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये स्वस्तात आऊट झाले आहेत. जेम्स अंडरसनने केन विलियमसनला 13 रनवर बोल्ड केलं, तर रॉस टेलर 14 रनवर एलबीडब्ल्यू झाला. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या ओली रॉबिनसनने टेलरला माघारी पाठवलं.
YESSSS @jimmy9 with a huge wicket! 🐐
— England Cricket (@englandcricket) June 2, 2021
Scorecard & Videos: https://t.co/7Bh6Sa3TPf#ENGvNZ pic.twitter.com/2Hke3L8Sqv
केन विलियमसन आणि रॉस टेलर यांचा खराब फॉर्म न्यूझीलंडसाठी चिंता वाढवणारा असला, तरी भारतीय टीमला मात्र दिलासा देणारा आहे. केन विलियमसन हा टेस्ट क्रिकेट क्रमवारीमध्ये सध्या पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन असला तरी त्याचं इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतलं रेकॉर्ड खराब आहे. विलियमसनने भारतात 35.46, दक्षिण आफ्रिकेत 21.16 आणि श्रीलंकेत 26.71 च्या सरासरीने रन केले आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये मात्र विलियमसनची कामगिरी चांगली झाली आहे. भारताविरुद्ध मागच्या 6 टेस्ट इनिंगमध्ये विलियमसनची कामगिरी खराब झाली. या 6 इनिंगमध्ये त्याला फक्त 1 अर्धशतकच करता आलं. विलियमसनने या काळात 22 च्या सरासरीने 132 रन केले.