WTC Final : इतिहासाची पुनरावृत्ती, टीम इंडियाला पुन्हा महागात पडणार ती मोठी चूक!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 249 रनवर ऑलआऊट केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 249 रनवर ऑलआऊट केला आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 22 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 249 रनवर ऑलआऊट केला आहे. भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माला (Ishant Sharma) 3 विकेट मिळाल्या. अश्विनला (R Ashwin) 2 आणि जडेजाला (Ravindra Jadeja) एक विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडला या सामन्यात 32 रनची छोटी पण महत्त्वाची आघाडी मिळाली. न्यूझीलंडला ही आघाडी मिळण्यातही टीम इंडियाने पुन्हा केलेली चूक कारणीभूत ठरली. न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 135/5 अशी होती, पण टीम साऊदी (Tim Southee) आणि काईल जेमिसन (Kyle Jamieson) यांनी 51 रन केले, ज्यामुळे किवी टीमला ही आघाडी घेता आली. जेमिसनने 16 बॉलमध्ये जलद 21 रन केले आणि टीम साऊदीने 46 बॉल खेळून 30 रनची खेळी केली. तळाच्या खेळाडूंची विकेट घेणं टीम इंडियासाठी बहुतेकवेळा डोकेदुखी ठरत आहे. याआधीही भारतीय टीम जेव्हा न्यूझीलंडमध्ये गेली होती तेव्हाही खालच्या फळीतल्या बॅट्समननी टीम इंडियाला त्रास दिला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या शेवटच्या 4 बॅट्समननी तब्बल 87 रन जोडले. याआधी न्यूझीलंड दौऱ्यात वेलिंग्टनमध्ये किवी टीमच्या शेवटच्या 4 बॅट्समननी 132 रन तर क्राईस्टचर्चमध्ये 82 रन केले होते. साऊथम्पटनमध्ये सुरू असणाऱ्या या सामन्यात भारताच्या शेवटच्या 4 बॅट्समनना 32 रन करता आले. यामध्ये अश्विनने 22 रन, इशांत शर्माने 4 रन, मोहम्मद शमीने 4 रन आणि बुमराहच्या शून्य रनचा समावेश आहे. दुसरीकडे 2018 साली भारताच्या इंग्लंड दौऱ्यातही सॅम करनने खालच्या फळीतल्या खेळाडूंना घेऊन महत्त्वाची आघाडी घेतली होती, ज्यामुळे भारताला त्या सीरिजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
    Published by:Shreyas
    First published: