मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final आधी न्यूझीलंडच्या या खेळाडूने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन!

WTC Final आधी न्यूझीलंडच्या या खेळाडूने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन!

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे.

मुंबई, 28 मे : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या मुकाबल्याआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आधी न्यूझीलंडचा आक्रमक बॅट्समन डेव्हिड कॉनवेने इंग्लंड आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. डावखुरा बॅट्समन डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने सराव सामन्यात शानदार अर्धशतक केलं आहे.

न्यूझीलंडच्या इन्ट्रा स्क्वॅड सराव सामन्यात डेवॉन कॉनवे, कॉलीन डि ग्रॅण्डहोम आणि ब्रेसवेल यांनी नाबाद अर्धशतकं केली. याचसोबत कॉनवेने इंग्लंडविरुद्धची सीरिज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्यासाठीची आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. कॉनवेने याआधीच वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. कॉनवेची पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. आता त्याला या फॉरमॅटमध्येही संधी मिळण्याची शक्यता आहे.

कॉनवेने 108 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 47.21 च्या सरासरीने 7,130 रन केले आहेत. यामध्ये 18 शतकांचा समावेश आहे. कॉनवेने न्यूझीलंडकडून 14 टी-20 मॅचमध्ये 59.12 च्या सरासरीने 473 रन केल्या. तर वनडेमध्ये त्याने 75 च्या सरासरीने 225 रन बनवल्या, यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. कॉनवे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखा आहे, पण त्याची शैली अनुभवी बॅट्समनसारखी आहे.

डेवॉन कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करतो, पण इंग्लंड सीरिजमध्ये त्याला ओपनिंगला खेळवलं जाऊ शकतं. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना अनेकवेळा पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंगला यावं लागतं, त्यामुळे ओपनिंग माझ्यासाठी मोठा मुद्दा नाही, असं कॉनवे म्हणाला.

First published:
top videos

    Tags: Cricket, New zealand, Team india