मुंबई, 4 मार्च : आज पासून भारतात बहुप्रतीक्षित महिला प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. महिला खेळाडूंना पुरुषांप्रमाणेच क्रिकेट स्पर्धांमध्ये सामान संधी देण्यात यावी याकरता बीसीसीआयने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन या दोन संघांमध्ये रंगणार असून स्पर्धेतील पहिला सामना जिंकून कोणता संघ विजयी सुरुवात करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 4 मार्च ते 26 मार्च या दरम्यान महिला प्रीमियर लीगचे सामने खेळवले जाणार असून यात 5 संघांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन , युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल या संघांमध्ये महिला आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवण्यासाठी चुरस असेल. नीता अंबानी यांचा मुंबई इंडियन्स संघ संघाचे नेतृत्व भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडे असेल. तर अदानी स्पोर्ट्स ग्रुप च्या गुजरात टायटनचे नेतुत्व ऑस्ट्रेलियन खेळाडू बेथ मूनीकडे सोपवण्यात आले आहे. Mumbai : महिलांना WPL मध्ये मोफत प्रवेश, मात्र ही प्रक्रिया करावी लागेल फॉओ; अन्यथा… हरमनप्रीत कौर हिला मुंबई इंडियन्सने लिलाव प्रक्रियेत 1.8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर बेथ मुनी हिला गुजरातने 2 कोटींना खरेदी केले. महिला आयपीएलच्या निमित्ताने क्रीडा रसिकांना उत्तम दर्जाचे क्रिकेट पहायला मिळणार आहे. आज सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी सायंकाळी 5: 30 वाजता महिला प्रीमियर लीगचा उदघाटन सोहोळा पारपडेल. यात अभिनेत्री किनारा अडवाणी, क्रिती सेनोन, गायक शंकर महादेवन इत्यादी या सोहोळ्यात परफॉर्म करणार आहेत. कधी होणार सामना ? आज महिला आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन यांच्यात होणार असून सामन्याला सायंकाळी 7:30 वाजता सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील D Y Patil स्टेडियमवर होणार आहे.
कुठे पाहाला सामना? महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने स्पोर्ट्स 18 च्या चॅनेल्सवर दाखवण्यात येणार आहेत. तसेच जिओ सिनेमावर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. महिलांना स्टेडियममध्ये हे सामने मोफत पाहायला मिळणार असून त्याकरता बुक माय शो वर जाऊन रजिस्टर करावे लागेल.