सिडनी, 01 मार्च : क्रिकेटमधून धावबाद हटवण्याची मागणी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये एका खेळाडूकडून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मध्ये रविवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत झाली. या सामन्यात आफ्रिकेनं पाकिस्तानला 17 धावांनी पराभूत केलं. विजयासह आफ्रिकेनं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यामुळे पाकिस्ताची पुढची वाट खडतर बनली आहे. दरम्यान, सामन्यात धावबाद झालेली पाकची कर्णधार जावेरिया खानने अजब वक्तव्य केलं आहे. तिने क्रिकेटमधून धावबाद हटवण्याची मागणी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानची कर्णधार जावेरिया खानला धावबाद व्हावं लागलं. सलामीला उतरलेल्या जावेरियाने 34 चेंडूत 31 धावा केल्या. मात्र 11 व्या षटकात ती धावबाद झाली. ट्रायनच्या तिचऱ्या चेंडूवर आलिया रियाझने थेट फटका मारला. तो गोलंदाजाच्या हाताला लागून स्टम्पला लागला. त्यावेळी क्रीजच्या बाहेर असल्याने जावेरियाला बाद देण्यात आलं. अशा पद्धतीनं बाद झाल्यानं जावेरिया नाराज झाली. सामन्यानंतर जावेरिया पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली की,‘धावबाद होण्याची ही पद्धत क्रिकेटमधून हटवायला हवी. मी याआधीही अशी धावबाद झाले. मी पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या क्षणी बाद झाले. यातून एक धडा घेतला की आता चेंडू कुठं आहे पाहूनचं क्रीज सोडायची. हे वाचा : ‘विराटला चुकताना पाहण्यात मजा आली’, गोलंदाजाने कोहलीच्या जखमेवर चोळलं मीठ यापूर्वी मांकडिंगच्या नियमावरून प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता पाकिस्तानची कर्णधार जावेरियाने त्यापुढे जात मत व्यक्त केलं आहे. गोलंदाज चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतो आणि निसटलेला चेंडू स्टम्पवर जाऊन आदळतो. खरंतर त्यावेळी गोलंदाजाने थ्रो केलेला नसतो. तेव्हा नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज सोडली असेल तर तो धावबाद ठरतो. जरी जावेरियाने अशी मागणी केली असली तरी आयसीसी असा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. हे वाचा : क्रिकेटचं किट खरेदीसाठी नव्हते पैसे, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या मुलीचे वडील विकतात दूध
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







