जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup 2023 मोठी अपडेट, पाहा टीम इंडिया कधी खेळणार पहिला सामना

World Cup 2023 मोठी अपडेट, पाहा टीम इंडिया कधी खेळणार पहिला सामना

वर्ल्ड कप मोठी अपडेट

वर्ल्ड कप मोठी अपडेट

पहिल्या दिवशी C गटात दक्षिण कोरियाविरुद्ध भारत सामना खेळून या स्पर्धेची सुरुवात करेल अशी माहिती मिळाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सध्या सर्वांच्या नजरा ह्या वनडे वर्ल्ड कप फायनलकडे आहेत. याच दरम्यान एक वर्ल्ड कप फायनलबाबत मोठी अपडेट येत आहे. 5 सप्टेंबर रोजी FIH पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी C गटात दक्षिण कोरियाविरुद्ध भारत सामना खेळून या स्पर्धेची सुरुवात करेल अशी माहिती मिळाली आहे. हा वर्ल्ड कप 5 सप्टेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान बुकित जलील इथे राष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या गेल्या वर्ल्ड कपमध्ये (2021) चौथ्या स्थानापर्यंत टीम इंडियाला पोहोचण्यात यश आलं. C गटात भारत आणि दक्षिण कोरिया व्यतिरिक्त स्पेन आणि कॅनडा या टीम आहेत.

हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा राजीनामा

भारतीय संघ 7 डिसेंबरला स्पेन आणि 9 डिसेंबरला कॅनडाशी गटसाखळीत भिडणार आहे. शनिवारी पुत्रजया येथील मर्क्युअर लिव्हिंग हॉटेलमध्ये एका समारंभात या स्पर्धेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यजमान मलेशिया गतविजेत्या अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि चिलीसह अ गटात आहेत, तर सहा वेळा विजेते जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त ब गटात आहेत. ड गटात नेदरलँड, बेल्जियम, पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहेत. क्रीडा प्रेमींसाठी सुपर संडे, दोन वर्ल्ड कप फायनल अन् बरंच काही; पाहा शेड्युल भारतीय टीम 2001 आणि 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कप विजेता राहिला आहे. आता यंदा हा वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात