जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा राजीनामा

हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा राजीनामा

हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा राजीनामा

29 जानेवारी रोजी जर्मनीने तिसऱ्यांदा हॉकी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. परंतु भारतात झालेला हॉकी वर्ल्ड कप जिंकण्यात भारतीय संघाला यश मिळाले नाही. भारतीय संघ क्रॉस ओव्हर मॅचमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी : ओडिशा येथे झालेल्या यंदाच्या पुरुष हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा क्रॉस ओव्हर मॅचमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. यानंतर आता भारताच्या पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रॅहम रीड यांच्या राजीनाम्यानंतर हॉकी विश्वात खळबळ उडाली आहे. 29 जानेवारी रोजी हॉकी वर्ल्ड कपमध्ये जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात कलिंगा स्टेडियमवर अंतिम सामना पारपडला. या सामन्यात जर्मनीने तिसऱ्यांदा हॉकी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. परंतु भारतात झालेला हॉकी वर्ल्ड कप जिंकण्यात भारतीय संघाला यश मिळाले नाही. भारतीय संघ क्रॉस ओव्हर मॅचमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला होता.   हे ही वाचा  : ऑस्ट्रेलिया सीरिजआधी विराट-अनुष्का पोहोचले ‘बाबां’च्या चरणी, पाहा PHOTO ग्रॅहम रीड यांची भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी एप्रिल 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने टॉकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये कांस्य पदक पटकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या 58 वर्षीय ग्रॅहम रीड यांनी आपला राजीनामा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

रीड यांनी राजीनामा देताना म्हंटले की, ‘आता पदावरून पायउतार होण्याची आणि नव्या व्यवस्थापकाकडे कार्यभार सोपवण्याची वेळ आली आहे. भारतीय संघासोबत आणि हॉकी इंडियासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मी या ऐतिहासिक प्रवासाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी भारतीय संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात