मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's World Cup, IND vs ENG : कॅप्टन मिताली पुन्हा फ्लॉप, टीम इंडियाला 3 झटपट धक्के

Women's World Cup, IND vs ENG : कॅप्टन मिताली पुन्हा फ्लॉप, टीम इंडियाला 3 झटपट धक्के

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup 2022) टीम इंडियाची लढत इंग्लंडशी (India Women vs England Women) सुरू आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup 2022) टीम इंडियाची लढत इंग्लंडशी (India Women vs England Women) सुरू आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या टीम इंडियानं तीन विकेट्स झटपट गमावल्या. कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आलेली मिताली फक्त 1 रन काढून परतली.

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) या जोडीला चांगली सुरूवात करण्यात अपयश आले. यास्तिका फक्त 8 रन काढून आऊट झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मितालीकडून भारतीय टीमला मोठी अपेक्षा होती. पण तिला अपेक्षापूर्ती करण्यात अपयश आले. मिताली 5 बॉलमध्ये 1 रन काढून आऊट झाली. मिताली ही सर्वाधिक सहा वर्ल्ड कप खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. तिच्यासाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरतेय. मितालीनं या वर्ल्ड कपमधील चार इनिंगमध्ये 11.50 च्या सरासरीनं फक्त 46 रन केले आहेत.  काळजीची गोष्ट म्हणजे चारपैकी तीन इनिंगमध्ये तिला दोन अंकी रनही करता आले नाहीत.

मिताली राज आऊट झाल्यानंतर बॅटींगला आलेल्या दीप्ती शर्माला तिची खातंही उघडता आलं नाही. ती शून्यावरच रन आऊट झाली. इंग्लंडकडून अन्या श्रवसबोलनं (Anya Shrubsole) दोन विकेट्स घेतल्या. भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या अन्यानं या मॅचमध्ये यास्तिकाला आऊट करत वन-डे क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे.

IPL 2022 : ...तर एक कोटीचा दंड, बंदी आणि पॉईंट्स कट, आयपीएलसाठी BCCIचे कडक नियम

टीम इंडियाची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही चौथी मॅच आहे. भारतीय टीमनं यापूर्वी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरूद्ध  विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडकडून पराभव स्विकारला आहे. इंग्लंडनं पहिल्या तीन्ही मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Cricket, England, Mithali raj, Team india