मुंबई, 30 सप्टेंबर: बांगलादेशमध्ये उद्यापासून महिलांच्या एशिया कपचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत सातव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरची टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारताची सलामी उद्या दुपारी श्रीलंकेशी होणार आहे. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचा विचार करता भारतीय संघ एक वेगळी रणनीती घेऊन या स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतनं तसे संकेतही दिले आहेत. काय आहे टीम इंडियाची रणनीती? 2023 च्या सुरुवातीलाच महिलांचा टी20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यादृष्टीनं वुमन्स आशिया कपमध्ये काही प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना आशिया चषकात संधी दिली जाणार असल्याचं हरमननं म्हटलं आहे. डी हेमलता आणि किरण नवगिरेसारख्या नव्या खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आलं होतं. पण त्यांना फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. जेमिमा रॉड्रिग्स मनगटाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळली नव्हती. पण आशिया कपमधल्या पहिल्या सामन्यात ती श्रीलंकेविरुद्द सलामीला खेळण्याची शक्यता आहे. शफालीच्या कामगिरीकडे नजर भारतीय संघाची आक्रमक सलामीवीर शफाली वर्मानं इंग्लंड दौऱ्यात मात्र निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे आशिया कप ही तिच्यासाठी पुन्हा फॉर्मात येण्यासाठी चांगली संधी ठरावी. दरम्यान भारतीय संघानं इंग्लंडला त्यांच्याच देशात वन डे मालिकेत 3-0 ने हरवण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे त्याच आत्मविश्वासानं वुमन ब्रिगेड आशिया चषकातल्या आव्हानांना सामोरी जाईल. हेही वाचा - Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेकडे नवी जबाबदारी, रहाणे बनला ‘या’ टी20 टीमचा कॅप्टन संधी न मिळालेल्यांना वाव सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत हरमननं ज्यांना जास्त संधी मिळाली नाही अशा खेळाडूंना जास्तीत जास्त वाव दिला जाणार असल्याच सांगितलं आहे. वर्ल्ड कपआधी बऱ्याच टी20 मॅचेस भारतीय संघ खेळणार आहे. त्यामुळे या खेळाडूंची चाचपणी करता येणार आहे.'
The Women in 🔵 are ready to conquer Asia! 👑
— Star Sports (@StarSportsIndia) September 29, 2022
🙌 if you #BelieveInBlue and cannot wait to watch @ImHarmanpreet lead #TeamIndia to glory:
Women's #AsiaCup2022 | Starts Oct 1 | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/KDYx3kOJ29
हेही वाचा - T20 World Cup: आमचा पहिला नंबर… वर्ल्ड कपसाठी 16 दिवस आधीच ही टीम पोहोचली ऑस्ट्रेलियात 7 ऑक्टोबरला महामुकाबला 1 ऑक्टोबरला यजमान बांगलादेश आणि थायलंड या सामन्यानं स्पर्धेची सुरुवात होईल. तर भारतीय संघ याच दिवशी श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. तर 7 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं भारतासमोर आव्हान असेल. या स्पर्धेचं यंदाचं हे आठवं वर्ष आहे. 2018 पर्यंत नियमितपणे ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. पण कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं नाही. महिलांच्या या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे राऊंड रॉबिन पद्धतीनं ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ 6-6 सामने खेळणार आहे.