नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : आयसीसीच्या वतीने पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये फ्रंटफुट नो बॉल तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Women’s T20 World Cup) या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या सामन्यात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वाचा- 7 वर्षांनंतर विराटची फ्लॉप कामगिरी! ‘या’ आकड्यांनी केली कॅप्टन कोहलीची पोलखोल आयसीसी करणार नो-बॉल तंत्रज्ञानाचा वापर आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘तिसरे पंच प्रत्येक चेंडूनंतर पुढच्या पायाच्या लँडिंग स्थितीवर लक्ष ठेवतील. चेंडू नो बॉल असेल तेव्हा मैदानावरचे पंच याबाबतीत सुचना देतील. फ्रंट फुट नो बॉलवर मैदानावरचे पंच निर्णय घेणार नाहीत. या तंत्रज्ञानाचा वापर 12 सामन्या दरम्यान केला होता. यावेळी 4 हजार 717 चेंडू टाकण्यात आले आणि 13 चेंडू नो बॉल होते. सर्व नो बॉलवर अचूक निर्णय घेण्यात आला. आयसीसीचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले की, ‘क्रिकेटमधील अधिकाऱ्यांनी सामन्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची चांगली परंपरा आहे. मला खात्री आहे की या तंत्राचा वापर केल्यामुळे आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कपमध्ये कमी चूका होतील. दरम्यान याआधी पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्येही याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाचा- ती एक धाव अपूर्णच राहिली…, LIVE सामन्यात क्रिकेटपटूच्या मृत्यूने खळबळ या स्पर्धेत 10 संघ भाग घेतील आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कप 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2020 या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होईल. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत. हे 10 संघ या स्पर्धेत एकूण 23 सामने खेळतील. पाच संघांच्या दोन गटात विभागले गेले आहेत. गट ‘अ’ मध्ये भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश पिछाडीवरचा चॅम्पियन व यजमान ऑस्ट्रेलियासह कायम आहे, तर गट बमध्ये इंग्लंडसह दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि थायलंड यांचा समावेश आहे. वाचा- वर्ल्ड कपमध्ये राडा घालणाऱ्या खेळाडूंवर ICCची कारवाई, भारतीय खेळाडूंचाही समावेश असे आहेत भारताचे सामने भारताचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ग्रुप स्टेजमध्ये भारत बांगलादेश संघाशी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर, तिसरा सामना 29 फेब्रवारीला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.