केंद्रपाडा, 11 फेब्रुवारी : क्रिकेटच्या मैदानात अनेक दुःखद आणि धक्कादायक प्रकार घडत असतात. असाच एका धक्कादायक प्रकार ओडिशात घडला. एका स्थानिक सामन्यादरम्यान ओडिशाच्या केंद्रीयपाडा जिल्ह्यातील कॉलेजच्या मैदानावर एक तरुण क्रिकेटपटू बेशुद्ध पडला. सहकारी खेळाडूंनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृत तरूण 18 वर्षांचा असून त्याचे नाव सत्यजित प्रधान आहे. तो जवळील देराविश महाविद्यालयात बारावीचा विद्यार्थी होता. वाचा- राहुल-अय्यरने राखली भारताची लाज! न्यूझीलंडला 297 धावांचे आव्हान वाचा- टीम इंडियाचा नवा संकटमोचक! केएल राहुलनं झळकावलं शानदार शतक ओडिशाच्या सत्यजित प्रधान केंदापाडा स्वायत्त महाविद्यालयाच्या मैदानावर स्थानिक सामना सुरू होता. या सामन्यात धाव काढायला गेलेला फलंदाज खेळपट्टीवरच बेशुद्ध पडला. प्रधान यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाचा- वर्ल्ड कपमध्ये राडा घालणाऱ्या खेळाडूंवर ICCची कारवाई, भारतीय खेळाडूंचाही समावेश वाचा- ‘पतीने इज्जत घालवली’, क्रिकेटपटूच्या पत्नीने पत्रातून व्यक्त केलं दु:ख दरम्यान, या संदर्भात अप्राकृतिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी मंगळवारी पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रीडा जगातील हे पहिलेच प्रकरण नाही जेव्हा एखाद्या खेळाडूचा अशाप्रकारे मृत्यू झाला, परंतु हे आश्चर्यकारक आहे की क्रिकेट हा फुटबॉल किंवा अथलेटिक्स सारखा धावपटू खेळ नाही. अशा परिस्थितीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू निश्चितच आश्चर्यचकित होतो. तथापि, सत्यजित प्रधान यांचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हेपोस्टमार्टमनंतरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.