मुंबई, 13 जुलै : विस्फोटक बॅट्समन क्रिस गेलने (Chris Gayle) मंगळवारी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (West Indies vs Australia) टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवून दिला. तिसऱ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 142 रनचं आव्हान वेस्ट इंडिजने 14.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. गेलने कांगारू बॉलर्सची धुलाई केली. त्याने फक्त 38 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्स मारले आणि 67 रन केले. या सामन्यात गेलच्या बॅटवर युनिव्हर्स बॉस (The Universe Boss) या नावाचं स्टीकर नव्हतं. याबाबत गेलला विचारलं असता त्याने आयसीसीमुळे (ICC) स्टीकर हटवल्याचं सांगितलं. आयसीसीला द युनिव्हर्स बॉस स्टीकरवर आक्षेप असल्याचं गेल म्हणाला. Cricket.com.au ने गेलचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘मी युनिव्हर्स बॉसचा स्टीकर लावू नये, असं आयसीसीला वाटतं, त्यामुळे मी स्टीकर छोटं केलं, आता फक्त The Boss लिहिलं आहे. आयसीसीला युनिव्हर्स बॉस या शब्दावर कॉपीराईट करायचं आहे, पण खरा युनिव्हर्स बॉस मीच आहे,’ असं गेल या व्हिडिओमध्ये म्हणाला.
Chris Gayle's got some fresh stickers after a short conversation with the ICC! 😅 #WIvAUS pic.twitter.com/99nxhrBrGP
— cricket.com.au (@cricketcomau) July 13, 2021
क्रिस गेलने या सामन्यात अर्धशतकी खेळीसोबतच आणखी एक विक्रम केला. टी-20 क्रिकेटमध्ये 14 हजार रन करणारा गेल हा पहिला खेळाडू ठरला आहे. गेलने पाच वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक केलं. याआधी 2016 वर्ल्ड कपमध्ये गेलने शेवटचं अर्धशतक केलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये गेल फ्लॉप ठरला होता. 4 सामन्यांमध्ये 18.66 च्या सरासरीने त्याने 56 रन केले. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 मध्येही गेल अपयशी ठरला. तिसऱ्या सामन्यात मात्र तो त्याच्या जुन्या अवतारात दिसला.