मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /TATA IPL 2023 : सर्व सामने मोफत पाहता येणार, डिजिटल पाहण्याचा अनुभव असेल खास

TATA IPL 2023 : सर्व सामने मोफत पाहता येणार, डिजिटल पाहण्याचा अनुभव असेल खास

 जिओ सिनेमावर आयपीएल मॅच फ्री पाहता येतील, त्यासाठी केवळ तुमच्याकडे हे अ‍ॅप असणं गरजेचं आहे.

जिओ सिनेमावर आयपीएल मॅच फ्री पाहता येतील, त्यासाठी केवळ तुमच्याकडे हे अ‍ॅप असणं गरजेचं आहे.

जिओ सिनेमावर आयपीएल मॅच फ्री पाहता येतील, त्यासाठी केवळ तुमच्याकडे हे अ‍ॅप असणं गरजेचं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 01 एप्रिल : ‘टाटा आयपीएल’च्या 16 व्या हंगामाला 31 मार्च 2023 पासून सुरुवात झालीय. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आता पुढील 2 महिने टी-20 क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. या हंगामातील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन टीममध्ये झाली. ही मॅच गुजरात टायटन्सनं जिंकली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, यंदा टाटा आयपीएलच्या सर्व मॅच तुम्ही टीव्हीबरोबरच जिओ सिनेमा या अ‍ॅपवरसुद्धा पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे जिओ सिनेमावर आयपीएल मॅच फ्री पाहता येतील, त्यासाठी केवळ तुमच्याकडे हे अ‍ॅप असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आयपीएल मॅच टीव्हीवर पाहावी की जिओ सिनेमा अ‍ॅपवर हे निवडण्यास मदत होऊ शकते.

    आयपीएल हा क्रिकेटचा उत्सव समजला जातो. जगभरातील क्रिकेटप्रेमी आयपीएलची वाट पाहत असतात. यंदाच्या आयपीएल मॅच टीव्हीवर पाहाव्यात की जिओ सिनेमावर असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर योग्य प्लॅटफॉर्म निवडण्यासाठी ज्या गोष्टी मदतीच्या ठरू शकतात त्या जाणून घेऊ.

    4K मध्ये पिक्चर क्वालिटी

    यंदा पहिल्यांदाच टाटा आयपीएल 4K पिक्चर क्वालिटीमध्ये पाहता येईल. जिओ सिनेमा अ‍ॅपद्वारे 4K व्ह्युईंगला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर क्रिकेटप्रेमी आयपीएलच्या मॅच पाहू शकतात.

    मॅच मोफत पाहण्याची संधी

    तुम्ही जिओ, एअरटेल, व्हीआय, बीएसएनएल किंवा इतर कोणतेही सिम कार्ड वापरत असाल, तरी तुम्हाला त्यावर जिओ सिनेमा हे अ‍ॅप डाउनलोड करून आयपीएल मॅच फुकट पाहता येतील. याचाच अर्थ जिओ सिनेमा अ‍ॅपवर मॅच पाहण्यासाठी कोणतेही पैसे भरण्याची गरज नाही.

    IPL 2023 : धोनी पुढचे सामने खेळणार की नाही? CSKच्या प्रशिक्षकांनी दुखापतीबाबत दिले अपडेट्स

    विविध भाषांमध्ये क्रिकेट कॉमेंट्री

    जिओ सिनेमावर तुम्ही 12 भाषांमध्ये मॅचची कॉमेंट्री ऐकू शकता. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओरिया आदींचा समावेश आहे. ज्या इनसाइडर फीड, हँगआउट फीड, फॅन्टसी फीड, फॅनझोन फीड यासह 16 फीडवर आहेत. या शिवाय तज्ज्ञांचा पॅनेल म्हणून जिओ सिनेमावर सुरेश रैना, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, आरपी सिंग, झहीर खान, इयॉन मॉर्गन, ग्रॅमी स्मिथ आणि स्कॉट स्टायरिस सारख्या टाटा आयपीएल चॅम्पियन आणि दिग्गजांचा एलिट क्लब देखील एकत्र केला गेलाय.

    हाइप फीचर

    जिओ सिनेमानं नुकत्याच संपलेल्या टाटा डब्ल्यूपीएलमध्ये अ‍ॅपमध्ये असणाऱ्या फीचर्सची एक झलक दाखवली आहे. परंतु टाटा आयपीएलमध्ये या फीचर्ससोबत आणखी काही महत्त्वाचे फीचर्स पाहण्यास मिळू शकतात. लोकप्रिय 'हाइप' फीचर परत आलं आहे, जे युजर्सला लाइव्ह अ‍ॅक्शनच्या सोबतच टीम स्कोअरिंग रेट, बॅट्समन स्कोअरिंग एरिया, बॉलर्सचा हीट मॅप, वॅगन व्हील्स, ट्रिव्हिया आणि इतर स्कोअर पाहता येईल.

    गर्लफ्रेंड म्हणाली, मी की धोनी? चाहत्याने हातात बोर्ड घेऊन गाठलं स्टेडियम

    मल्टी-कॅम

    जिओ सिनेमा युजर्सना मेन कॅम, बर्ड्स आय कॅम, स्टंप कॅम, केबल कॅम आणि बॅटर कॅम यासारख्या अनेक कॅमेरा अँगलमध्ये टॉगल करण्याचा पर्याय देत आहे. त्यामुळे जर तुम्ही सूर्यकुमार यादवची 360 डिग्री बॅटिंग किंवा एम एस धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहून रोमांचित झाला असाल, तर तुम्ही डिजिटलवर मल्टी-कॅम मोड निवडून तो पुन्हा कसा पाहयचा, हे निवडू शकता. यंदाची टाटा आयपीएल ही जिओ सिनेमामुळे आणखी खास ठरणार आहे. यामुळे तुम्ही प्रवासामध्येही सहज टाटा आयपीएल मॅच पाहू शकता.

    First published:
    top videos

      Tags: Cricket, IPL 2023