मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : धोनी पुढचे सामने खेळणार की नाही? CSKच्या प्रशिक्षकांनी दुखापतीबाबत दिले अपडेट्स

IPL 2023 : धोनी पुढचे सामने खेळणार की नाही? CSKच्या प्रशिक्षकांनी दुखापतीबाबत दिले अपडेट्स

गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी दुखापतीने त्रस्त झाल्याचं दिसला. यामुळे काही वेळ सामना थांबवण्यातही आला होता.

गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी दुखापतीने त्रस्त झाल्याचं दिसला. यामुळे काही वेळ सामना थांबवण्यातही आला होता.

गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी दुखापतीने त्रस्त झाल्याचं दिसला. यामुळे काही वेळ सामना थांबवण्यातही आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदाबाद, 01 एप्रिल : आयपीएलचा यंदाचा हंगाम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीसाठी खास आहे. मीडिया रिपोर्टनुसार धोनी या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना धोनीला या हंगामात सर्व सामने खेळताना पाहण्याची इच्छा आहे. दरम्यान, पहिल्याच सामन्यात धोनी दुखापतीने त्रस्त झाल्याचं दिसून आलं. एक चेंडू अडवण्यासाठी धोनीने डाइव्ह मारली. तेव्हा त्याच्या पायात वेदना सुरू झाल्याचं दिसलं.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनीचे पायाचे स्नायू दुखावले. यावेळी धोनीला प्रचंड वेदनाही होत होत्या. मात्र तरीही धोनी अखेरच्या चेंडूपर्यंत मैदानावर खेळला. गुजरात टायटन्सच्या फलंदाजीवेळी दीपक चाहरने १९वे षटक टाकलं. यात धोनी डाइव्ह मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी धोनीच्या पायाला दुखापत झाली. तेव्हा डाव काही वेळ थांबवण्यातही आला होता. मैदानावर फिजिओ आल्यानंतर त्याच्यावर उपचार केले. फिजिओंशी चर्चा केल्यानंतर धोनी मैदानात खेळला.

टायगर अभी जिंदा है! धोनीची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री, CSKचा पहिलाच असा फलंदाज 

धोनीच्या दुखापतीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी माहिती दिली आहे. धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. धोनीच्या पायात फक्त क्रॅम्प्स आले होते, त्याच्या गुडघ्याला दुखापत झालेली नाही. धोनी यंदाच्या हंगामासाठी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.

धोनी सध्या ४१ वर्षांचा आहे. वयानुसार त्याला त्याच्या मर्यादा माहिती आहेत पण तो ग्रेट नेता आहे. फलंदाजीसह एक दिग्गज आणि महत्त्वाचा प्लेअर म्हणून तो भूमिका बजावेल असं स्टिफन फ्लेमिंग यांनी म्हटलं. उद्घाटनाच्या सामन्याआधीही धोनी अडखळत चालताना दिसला होता. मैदानावर सरावासाठी आल्यावर धावताना धोनीला त्रास होत होता. वर्षभर क्रिकेट न खेळल्यानं आता ही दुखापत धोनीसह संघाची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2023, MS Dhoni