मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CSK ने रैनाला का केलं नाही रिटेन? सेहवागने केला मोठा खुलासा

CSK ने रैनाला का केलं नाही रिटेन? सेहवागने केला मोठा खुलासा

Suresh Raina

Suresh Raina

आयपीएल 2022(IPL 2022) चा मेगा लिलाव अनेक गोष्टींमुळे विशेष ठरला. अनेक अनकॅप्ड खेळाडूंना करोडपती बनवले, अनपेक्षीत खेळाडूंवरही मोठी बोली लागली, तर काही स्टार खेळाडू अनसोल्डही राहिले. आयपीएलच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरेश रैनाला (Suresh Raina )लिलावादरम्यान एकही खरेदीदार मिळाला नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 29 मार्च: आयपीएल 2022(IPL 2022) चा मेगा लिलाव अनेक गोष्टींमुळे विशेष ठरला. अनेक अनकॅप्ड खेळाडूंना करोडपती बनवले, अनपेक्षीत खेळाडूंवरही मोठी बोली लागली, तर काही स्टार खेळाडू अनसोल्डही राहिले. आयपीएलच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरेश रैनाला (Suresh Raina )लिलावादरम्यान एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्सनेही (CSK) त्याच्यासाठी बोली लावली नाही. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. पण त्याचे उत्तर स्पष्ट समोर आले नाही. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) रैना आणि सीएसके संदर्भात खुलासा केला आहे.

सुरेश रैनाला बाल्कनी असलेली खोली हवी होती?

सुरेश रैनाच्या बाबतीत जे घडले ते 2020 मध्ये दुबईतील आयपीएलमुळे घडले. एका सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान सेहवाग म्हणाला, 'सुरेश रैनासाठी दुःखी आहे. सीएसकेकडून तो इतकी वर्षे खेळला. माझ्या मते त्याला जाता जाता फेअरवेल मॅच द्यायला हवी होती. सीएसकेने त्याला 2 कोटींना विकत घेतले असते आणि 1 सामना खेळून त्याला निरोप दिला असता तर बरे झाले असते असे मत वीरेंद्र सेहवागने यावेळी व्यक्त केले.

तसेच, 'कदाचित 2020 मध्ये जेव्हा सुरेश रैनाने दुबईत आयपीएल सोडले आणि सीएसकेसोबतचे त्याचे नाते बिघडले, याच कारणास्तव त्याला विकत घेतले नाही.

2020 चा आयपीएल हंगाम (IPL 2020 Season) हा युएईमध्ये सुरू होणार होता. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जमधील 13 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाले.

दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड देखील पॉझिटिव्ह होते. यानंतर काही दिवसातच सुरैश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली.

त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की रैनाला धोनीसारखीच रूम हवी होती. धोनीच्या रूमला बाल्कनी होती. यावरून रैनाचा आणि संघ व्यवस्थापनाचा वाद झाला. धोनीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो स्वतःच्या मतावर ठाम राहिली. रैनाने थेट आयपीएलमधून माघार घेतली.

याबाबत सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी देखील प्रतिक्रिया दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. ते म्हणाले होते की, 'जर तुम्ही एकाच गोष्टीवर अडून बसला आहात किंवा तुम्ही आनंदी नसाल तर तुम्ही परत जा. मी कोणालाही काहीही करण्याची सक्ती केलेली नाही. काहीवेळा यश तुमच्या डोक्यात जाते.' इथेच रैनाचा सीएसके चॅप्टर क्लोज झाला होता. मात्र ज्यावेळी संघातील वाद चव्हाट्यावर येऊ लागला त्यावेळी सुरेश रैनाने आपण वैयक्तिक कारणाने आयपीएलमधून माघार घेत आहोत असे सांगितले.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Suresh raina, Virender sehwag