मेलबर्न, 12 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या फायनलला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. मेलबर्नच्या मैदानात आठव्या टी20 वर्ल्ड कपची ही फायनल खेळवली जाणार आहे. बाबर आझमची पाकिस्तान आणि जोस बटलरची इंग्लंड यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदासाठी भिडणार आहेत. पण या दोघांपैकी 13 कोटी रुपयांचा मालक कोण होणार? याचं उत्तरही आपल्याला सामना संपल्यानतर मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे 13 कोटींचं प्रकरण काय? तर 13 कोटी रुपये ही विजेत्या संघाला आयसीसीकडून दिली जाणारी बक्षिस रक्कम आहे. 13 कोटींवर कुणाचा दावा? खरं तर पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी सुपर 12 फेरीत आपापल्या ग्रुपमध्ये दुसरं स्थान गाठलं होतं. पण सेमी फायनलमध्ये ग्रुपमधल्या टॉप टीम्सना हरवून हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत. सेमी फायनलमध्ये जोस बटलर आणि बाबर आझम या दोघांनी अर्धशतकं झळकावली होती. इतकच नव्हे तर त्यांचे ओपनिंग पार्टनरही फॉर्मात आले आहेत. रिझवान आणि हेल्सनही सेमी फायनलमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Pakistan's new-ball attack 🆚 England's opening firepower
— ICC (@ICC) November 12, 2022
Who will win the Powerplay battle?#T20WorldCup | More 👇https://t.co/TnnPe8gTfI
गेल्या काही सामन्यात पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदीलाही सूर गवसलाय. तर मार्क वुड आणि सॅम करन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे 13 कोटींच्या बक्षिस रकमेवर सध्या कुणा एकाचा दावा सांगणं कठीण आहे. आयसीसीकडून कोट्यवधींची बक्षिसं आयसीसीकडून विजेत्या संघाला जवळपास 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या टीमला साडेसहा कोटी रुपये मिळतील. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपआधी आयसीसीनं देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेची घोषणा केली होती. आयसीसी बक्षिसापोटी तब्बल 45.67 कोटी रुपये खर्च करणार आहे. सेमी फायनल हरणाऱ्या संघालाही आयसीसीकडून घसघशीत रक्कम दिली जाते. त्यानुसार भारतीय संघाला हरल्यानंतरही जवळपास 3 कोटी 27 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. तर पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनल हरलेल्या न्यूझीलंडला देखील इतकीच रक्कम मिळणार आहे. हेही वाचा - T20 World Cup: पाकिस्तानी पंतप्रधानांना इरफान पठाणचा करारा जवाब, म्हणाला ‘तुमच्यात आणि आमच्यात…’ फायनलवर पावसाचं सावट दरम्यान रविवारी होणाऱ्या फायनलवर पावसाचं सावट आहे. मेलबर्नमध्ये याआधी तीन सामने पावसामुळे वाया गेले होते. पण फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. जर रविवारी सामना झाला नाही तर सोमवारी खेळवण्यात येईल. जर दोन्ही दिवशी पावसानं खेळ वाया गेल्यास संयुक्त विजेते घोषित करण्यात येतील. हेही वाचा - Virat Kohli: किंग कोहली पोहोचला मुंबईत, एअरपोर्टवर फॅन्सना दिला असा रिप्लाय, पाहा Video टी20 वर्ल्ड कप मेगा फायनल पाकिस्तान वि. इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. स्टार स्पोर्टस नेटवर्क, हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण