लखनऊ, 27 नोव्हेंबर : क्रिकेट म्हंटल की फिटनेस आला, त्यामुळं फलंदाज असो किंवा गोलंदाज फिट राहण्याकडे खेळाडूंचा कल असतो. मात्र तुम्ही 140 किलो वजनाच्या गोलंदाजानं जबरदस्त कामगिरी केली असे ऐकले आहे का? मात्र असा प्रकार क्रिकेटच्या इतिहासात घडला आहे. वेस्ट इंडिजचा जलद गोलंदाज रहकिम कॉर्नवॉलने (Rahkeem Cornwall) आपल्या आक्रमक गोलंदाजीनं विक्रमी कामगिरी केली आहे. सध्या लखनऊमध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. 140 किलोच्या कॉर्नवॉलनं एका कसोटी सामन्यात 7 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीसह त्यानं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी रहकीमनं 75 धावा देत 7 विकेट घेतल्या. रहकीमच्या या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं अफगाणला 187 धावांवर रोखले. कॉर्नवॉलनं 25.3 ओव्हरमध्ये 5 मेडन ओव्हरमध्ये की कामगिरी केल्या. त्यानं 2.94च्या इकोनॉमीनं 75 धावा दिल्या. वाचा- वर्षभरापासून संघाबाहेर तरी विराट-रोहित तोडू शकले नाही स्टार क्रिकेटपटूचा रेकॉर्ड
वाचा- अर्जुनच्या नावानं निवड समितीला घातल्या शिव्या, सचिन तेंडुलकर म्हणाला… भारताविरोधात केले होते पदार्पण वेस्ट इंडिजच्या या ऑलराऊंडर खेळाडूनं याच वर्षी जमैकामध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पदापर्ण केले होते. त्यावेळी कॉर्नवॉलनं 2 कसोटी सामने खेळले होते. यात त्यानं 10 विकेट घेतल्या होत्या. या खेळाडूनं आतापर्यंत 56 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यात 2 हजार 239 धावा केल्या आहेत. तर, 263 विकेट घेतल्या आहेत. 2017मध्ये रहकीम कॉर्नवॉलनं भारताविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. यात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (Virat Kohil), अजिंक्य रहाणे यांसारख्या फलंदाजांना बाद केले होते. वाचा- चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2021पर्यंत फक्त धोनी…धोनी! भारताविरुद्ध झालेल्या अभ्यास वर्गात आला चर्चेत रहकीम कॉर्नवॉलनं 2017मध्ये भारताविरद्ध सराव सामना खेळला होता. या सामन्यात या 26 वर्षीय गोलंदाजानं 140 किलो वजन असूनही आपल्या गोलंदाजीनं सर्वांचे लक्ष वेधले. कॉर्नवॉल आपल्या जलद गोलंदाजीनं फलंदाजांवर दबाव टाकण्यास हुशार आहे. एकीकडे फिटनेस खेळाडूंसाठी अतिमहत्त्वाचे झाले असताना 140 किलोंचा हा गोलंदाज जगभरत चर्चेत आला आहे.

)







